वाहनचालकांचे होणार कोविड लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:24 AM2021-07-23T04:24:52+5:302021-07-23T04:24:52+5:30

ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि सेवाभावी संस्थांच्या वतीने सर्वसामान्य वाहनचालकांसाठी शुक्रवारी विनामूल्य कोविड लसीकरण शिबिर आयोजित ...

Drivers will be vaccinated | वाहनचालकांचे होणार कोविड लसीकरण

वाहनचालकांचे होणार कोविड लसीकरण

Next

ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि सेवाभावी संस्थांच्या वतीने सर्वसामान्य वाहनचालकांसाठी शुक्रवारी विनामूल्य कोविड लसीकरण शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराचा लाभ महिला आणि पुरुष रिक्षा तसेच ट्रकचालकांनाही घेता येणार आहे. आरटीओ कार्यालयाने आपल्या नियमित कामाबरोबरच सामाजिक जाणिवेतून या शिबिराचे आयोजन केले आहे.

कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी वाहनचालक कोरोनाकाळातही काम करीत आहेत. त्यातही रिक्षाचालक हे सार्वजनिक वाहतूक करीत असल्याने त्यांचा दररोज अनेक प्रवाशांशी संबंध येतो. त्यामुळे ट्रक आणि रिक्षाचालकांचे लसीकरण होणे अत्यावश्यक आहे. त्यांच्यात लसीकरणाबाबत जागृती करण्यासाठी ठाणे आरटीओ कार्यालयाने रिक्षा आणि ट्रकचालकांसाठी हे विनामूल्य लसीकरण शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात महिला रिक्षाचालकांचेही लसीकरण केले जाणार आहे. या शिबिरात सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि सेवाभावी संस्थाही सहभागी होणार आहेत. हे शिबिर लुईसवाडी, ठाणे येथील नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात दुपारी ४ ते ६ या वेळेत होणार असून किमान १०० चालकांचे लसीकरण करण्याचा मानस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी व्यक्त केला.

Web Title: Drivers will be vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.