शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

नियम मोडणारे वाहनचालकच आता करणार  वाहतूक नियमांची जनजागृती; ठाणे वाहतूक पोलिसांचा अभिनव उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 12:57 IST

त्यानुसार वाहनचालकांनी सिग्नल मोडल्यास दंड वसूल केला जाणार नसून, त्याऐवजी त्यांनाच १५ ते २० मिनिटे सिग्नलवर जनजागृती करावी लागणार आहे. केंद्र सरकारच्या नव्या मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी राज्यभरात सुरू झाली आहे.

ठाणे :  ठाणे पोलीस शहरातील महत्त्वाच्या सिग्नल परिसरात स्वयंसेवकांच्या मदतीने हेल्मेट परिधान करणे टाळणाऱ्या आणि सिग्नल मोडणाऱ्या वाहनचालकांना सिग्नल परिसरातच उभे करून त्यांच्याकडून वाहतूक नियमांसंबंधी जनजागृती करून घेणार आहेत. गुरुवारपासूनच हा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. 

त्यानुसार वाहनचालकांनी सिग्नल मोडल्यास दंड वसूल केला जाणार नसून, त्याऐवजी त्यांनाच १५ ते २० मिनिटे सिग्नलवर जनजागृती करावी लागणार आहे. केंद्र सरकारच्या नव्या मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी राज्यभरात सुरू झाली आहे. या नव्या कायद्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या दंडाच्या रकमेत दुप्पट वाढ झाली आहे. ई चलान कार्यपद्धतीमुळे कारवाई होत असली तरीही नियमांचे उल्लंघन सुरूच आहे. प्रत्येक महिन्यात ठाणे शहरात नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण हे हजारांच्या घरात असते. 

दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर टाळणाऱ्यांचा आणि सिग्नल लाल रंगाचा असतानाही तो ओलांडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. अशा वाहनचालकांविरोधात कारवाईसाठी नवी शक्कल लढविली आहे. त्यानुसार ठाणे शहरातील महत्त्वाच्या सिग्नल परिसरात वाहतूक पोलिसांचे कर्मचारी आणि काही स्वयंसेवक उभे राहणार आहेत. 

दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करणारे आवश्यक आहे. अनेक वाहनचालक या नियमाचे उल्लंघन करतात. त्यामुळे अपघात घडण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेकांचे यामुळे मृत्यूही झालेले आहेत. लाल रंगाचे सिग्नल असतानाही वाहनचालक तो ओलांडताना दिसतात. अशा वाहनचालकांना १५ ते २० मिनिटे सिग्नलवर जनजागृती करावी लागणार आहे. वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी, एवढाच यामागचा उद्देश आहे. - बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी