शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चार किमीच्या बोगद्यासाठी डोंगराला ड्रिलिंग; पनवेल-बदलापूर अंतर कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 08:05 IST

सोबतच बदलापूरहून पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून बोगदा खोदण्याचे काम बेंडशीळ गावाजवळ सुरू करण्यात आले आहे.

बदलापूर : बडोदा-जेएनपीटी महामार्गाचे काम सध्या राज्यात प्रगतिपथावर आहे. हा महामार्ग बदलापूरमधून जात असून, त्यामुळे भविष्यात बदलापूरला थेट पनवेल आणि मुंबईची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. सोबतच बदलापूरजवळ लॉजिस्टिक हब उभारणीला या महामार्गामुळे चालना मिळणार आहे. बदलापूर ते पनवेल ४.१६ किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. 

पालघर जिल्ह्यातील तलासरी ते रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील करंजाडे गावापर्यंत हा महामार्ग असेल. महाराष्ट्रात १८९ किमी लांब आणि १२० मीटर रुंद असा महामार्ग असेल. हा रस्ता बदलापूरजवळून जात आहे. बदलापूरच्या बेंडशीळ गावाजवळ सध्या या रस्त्याचे काम जोरात सुरू आहे. सोबतच बदलापूरहून पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून बोगदा खोदण्याचे काम बेंडशीळ गावाजवळ सुरू करण्यात आले आहे. तब्बल साडेचार किमी लांबीचा हा बोगदा पूर्ण होण्यासाठी जून २०२५ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 

२ किमीपर्यंत काम पूर्णबदलापूरहून पनवेलच्या दिशेने एक किलोमीटर आणि पनवेलहून बदलापूरच्या दिशेने एक किलोमीटर अशा दोन किलोमीटरपर्यंतच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजूने सुरू केलेल्या बोगद्याचे काम डोंगराच्या मध्यभागी जोडले जाणार आहे. कामाला गती मिळावी यासाठी पनवेल आणि बदलापूर अशा दोन्ही बाजूने काम सुरू झाल्याने या बोगद्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा आमदार कथोरे यांनी व्यक्त केली आहे. या मार्गासाठी कल्याण तालुक्यातील रायते, बदलापूरच्या दहिवलीतून इंटरचेंज असणार आहे. 

बडोदा-मुंबई महामार्गामधील सर्वांत महत्त्वाचा टप्पा या चार किलोमीटर बोगद्याचा असून, त्याचे काम जलदगतीने सुरू आहे. बोगद्यासोबतच महामार्गाचे कामही बदलापूर शहरात प्रगतिपथावर असून, ते काम  जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. - सुहास चिटणीस, प्रकल्प अधिकारी, नॅशनल हायवे