शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 05:30 IST

आगरी, कोळीबांधवांसह लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कार्ला येथील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

भिवंडी : आगरी, कोळीबांधवांसह लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कार्ला येथील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. एकवीरा देवी व मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी ही बंदी घातली आहे. ड्रेसकोडसंदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी ७ जुलैपासून करण्यात येणार असल्याची माहिती कार्ला एकवीरा आई ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त खा. सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांनी दिली. शुक्रवारी कार्ला येथे आई एकवीरा देवीच्या मंदिरात विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ड्रेसकोडसंदर्भात हा ठराव मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.

दर्शनासाठी काही भक्त अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून येतात. त्यामुळे  मंदिराचे पावित्र्य धोक्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

कोणत्या कपड्यांना बंदी ? : शॉर्ट, मिनी स्कर्ट, वेस्टर्न कपडे, फाटक्या जीन्स, हाफ पँट व अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी घातली आहे.

कोणते कपडे घालावेत ? : महिला व मुलींनी

साडी, सलवार कुर्ता किंवा इतर भारतीय पारंपरिक कपडे घालावेत ज्याने पूर्ण अंग झाकलेले असावे. पुरुषांनी व मुलांनी धोतर, कुर्ता पायजमा, पँट शर्ट, टी-शर्ट व इतर पारंपरिक कपडे ज्याने पूर्ण अंग झाकलेले असावे.

वाद घालणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सूचना : दर्शन घेताना येथील कर्मचारी भक्तांवर आरडाओरड करतात. भक्तांशी वाद घालत असल्याच्या तक्रारीही होत्या. कर्मचाऱ्यांनी भक्तांशी वाद न घालण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.