लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : बदलापुरात एका दारुड्या मुलाने दारूच्या नशेतच आपल्या वृद्ध आईची हत्या केली. ३ जुलै रोजी ही घटना घडली असून मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.बदलापूर मांजर्ली भागातील दिपाली पार्क इमारतीत विजय शिंदे हा आई शकुंतला शिंदे (७०) यांच्यासोबत रहात होता. विजय दारूच्या आहारी गेल्याने त्याचे कुटुंबातील इतर भावंडांसोबत आणि नातेवाईकांसोबत त्याचे जमत नव्हते. त्यामुळे तो आईसोबत बदलापुरातच रहात होता. कल्याण - डोंबिवली महापालिका परिवहन सेवेच्या बसमध्ये तो वाहक म्हणून काम करत होता. ३ जुलैला जेवण तयार करताना आई आणि मुलामध्ये कडाक्याचे भांडण सुरु झाले. आधीच दारुच्या नशेत असलेल्या विजयने रागाच्या भरात आपल्या आईचे डोके जमिनीवर आपटले. तसेच डोक्याला जोरदार मार लागल्याने आईचा जागेवरच मृत्यू झाला. याची माहिती शेजारच्यांनी पोलिसांना दिली.
दारुड्या मुलाने केली वृद्ध आईची हत्या
By admin | Updated: July 5, 2017 04:41 IST