शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. चारुदत्त शिंदे यांची पुन्हा प्रतिनियुक्तीवर ठाणे महापालिकेत नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 17:17 IST

ठाण्यात कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात मधल्या काळात महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. राजू मुरुडकर यांना पाच लाखांची लाच घेतांना अटक करण्यात आली आहे.

ठाणे  : ठाण्यात वाढत्या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने ठाणो महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदावर पुन्हा डॉ. चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार बुधवारी ते सेवेत रुजु झाले आहे. यापूर्वी देखील कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेस त्यांची अशाच प्रकारे नियुक्ती करण्यात आली होती.

ठाण्यात कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात मधल्या काळात महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. राजू मुरुडकर यांना पाच लाखांची लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर हे पद रिक्त होते, त्याचवेळेस महापालिकेतील डॉ. वैजयंती देवगीकर यांची प्रभारी म्हणून मुख्य वैद्यकीय आरोग्य पदावर नियुक्ती करण्यात आली होती. परंतु ठाण्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची सेवा वाढत असल्याने आरोग्य सेवेवर देखील ताण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत येथे उच्च दर्जाचा अधिकारी असावा अशी भुमिका व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार राज्य शासनाने सेंट जॉर्ज रुग्णालयातील उपअधिक्षक डॉ. चारुदत्त शिंदे यांची प्रतिनियुक्तीवर ठाणो महापालिकेत मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी देखील या संदर्भातील आदेश काढीत शिंदे हे बुधवार पासून सेवेत रुजु होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर देवगीकर यांना पुन्हा त्यांच्या मुळ पदावर आणण्यात आले आहे.

दरम्यान पहिला लाटेत देखील शिंदे यांची १० जून २०२० मध्ये आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्यांनी चांगली कामगिरी केली नसल्याचेच दिसून आले होते. तसेच फारशी छाप देखील त्यांनी सोडली नव्हती. असे असतांना पुन्हा त्यांनाच या पदावर का आणण्यात आले असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस