ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या ३६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ठाण्याच्या विकासात महत्वाचे योगदान देणाऱ्या अनेक नामवंत व्यक्तींना “ठाणे भूषण”, ठाणे गौरव”,व ‘ठाणे गुणीजन’ हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राच्या लोककलेचा महाराष्ट्राबरोबरच जगभरात प्रचार आणि प्रसार करणारे डॉ. प्रकाश खांडगे व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत झोपडपट्टीतील गरीब गरजू व्यक्तींना तसेच अतिदुर्गम आदिवासी,वारली समाजातील व्यक्तींना आपली वैद्यकीय सेवा देणारे डॉ.जालिंदर भोर यांना यंदाचा ठाणे महानगरपालिकेचा मानाचा “ठाणे भूषण” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतन येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी २० व्यक्तींना ‘ठाणे गौरव’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये मधुकर पाटकर, धनंजय निंबाळकर, शशिकांत नाईक, चंद्रकांत भोईटे, अरविंद विंचूरे, डॉ. चंद्रशेखर वावीकर, विश्वासराव सकपाळ, वैशाली इराणी, अशोक शिंपी, डी.बी.चांद, प्रमोद सालस्कर, सुरेखा यादव, डॉ ललिता भानुशाली, प्रा.मंदार टिल्लू, सतीश खोत, मंगेश चिवटे, कृष्णकुमार नायर, घनश्याम तिवारी, दशरथ माळी, व प्रकाश कोटवानी यांना हा पुरस्कार देण्यात आला. दरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण ९६ व्यक्तींना ठाणे गुणीजन हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर शैक्षणिक,कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २४ विद्यार्थ्यांचा ठाणे विशेष सत्कार म्हणून सन्मान करण्यात आला. ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०१८ चे आयोजन करणायत आले होते या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना यावेळी पारितोषिक देण्यात आले.यामध्ये गणेशोत्सव आरास स्पर्धा प्रथम क्रमांक गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,द्वितीय क्रमांक जयभवानी मित्र मंडळ,तृतीय क्रमांक चैतन्य मित्र मंडळ, चतुर्थ क्रमांक नवतरुण मित्र मंडळ, पाचवा क्रमांक सार्वजनिक उत्सव मंडळ,सहावा क्रमांक पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सातवा क्रमांक शिवसम्राट मित्र मंडळ, आठवा क्रमांक शिवगर्जना मित्र मंडळ तर स्वच्छता पुरस्कार प्रथम क्रमांक श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ, द्वितीय क्रमांक सार्वजनिक उत्सव मंडळ, तृतीय क्रमांक शिवाईनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, उत्कृष्ट मूर्तिकार प्रथम विश्वास म्हाडेश्वर, द्वितीय क्रमांक बंडू खैरे, तृतीय क्रमांक दिपक गोरे यांना पारितोषिक देण्यात आले.
--------------------------------------------------------
ठाणे महापालिका परिसरात वैद्यकीय क्षेत्रात आपली सेवा बजावत असताना केरळ पूरस्थितीत अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष पथक नेमून तेथील नागरिकांना आपली वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल ठाण्यातील डॉक्टरांचा ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनी पालिकेकडून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ.दिनकर देसाई, डॉ.दिनेश पाटील, डॉ.समीर घोलप, डॉ. मारिया आशीरवडम, डॉ मिलिंद नाईक, डॉ शुभांगी चव्हाण,डॉ टी.आर. पाटील, डॉ. जयंत जाधव, डॉ.हेमंत वानखेडे, डॉ.श्रीकांत ठाकरे, शिरीष तिगारे, डॉ.मानसी डोईफोडे, डॉ.प्रमोद पाटील, डॉ.कमलेश अगरवाल, डॉ. राहुल शेळके, डॉ. चित्रलेखा मेहता, डॉ.सुधीर सावंत, डॉ. शशिकांत,शिंदे, डॉ.राहू बापट, डॉ.शाह अर्जुन सिंग,डॉ. सुहासिनी मिश्रा,डॉ छाया घारपुरे, डॉ.मनीष सिंग व डॉ. जयेश परमार या सर्वांचा पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते डॉक्टरांचा विशेष सत्कार करण्यात आला.