शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आनंदीबाई जोशी रु ग्णालयाचा पुनर्विकास करण्याचे महापौरांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:20 IST

वर्तकनगर येथील महापालिकेच्या डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयाची दुरवस्था झाली असून रुग्णालयाच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

ठाणे, दि. 28 -  वर्तकनगर येथील महापालिकेच्या डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयाची दुरवस्था झाली असून रुग्णालयाच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. सोमवारी सकाळी महापौरांनी स्थानिक नगरसेवक आणि पालिकेच्या अधिकाºयांसह या रुग्णालयाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले.डॉ.आनंदीबाई जोशी रु ग्णालयात २६ आॅगस्ट २०१७ रोजी शॉर्टसर्किट झाले होते. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही हानी झाली नाही. याच पार्श्वभूमीवर महापौरांनी सोमवारी ही पाहणी केली. उपमहापौर रमाकांत मढवी, स्थानिक नगरसेविका विमल भोईर, महापालिकेचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले, सहाय्यक आयुक्त चारुशीला पंडीत आणि कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड आदी यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित होते.या रुग्णालयाची इमारत २८ वर्षे जुनी असून तिच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव २०१७- २०१८ च्या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आलेला आहे. त्यासाठी आर्थिक तरतूदही केल्याची माहिती महापौरांनी यावेळी दिली. वर्तकनगर, लोकमान्यनगर, भीमनगर, शास्त्रीनगर, येऊर, उपवन, पाटोणपाडा, कोकणीपाडा, शास्त्रीनगर, येऊर, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, पवारनगर आणि वागळे इस्टेट आदी चार ते पाच लाख लोकवस्तीच्या परिसरातील रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. सध्याची लोकसंख्या विचारात घेऊन वाढीव खाटांचे अद्ययावत रु ग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश यापूर्वी प्रशासनास दिले आहेत.या रु ग्णालयाच्या वास्तूची संबंधित अधिकाºयांसमवेत पाहणी केल्यानंतर रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून डॉक्टरांशी केलेल्या चर्चेनंतर वर्तनगर येथील महापालिका शाळा क्रमांक ४४ च्या इमारतीमध्ये बाहयरुग्ण तपासणी आणि लोकमान्यनगर येथील पालिकेच्या रुग्णालयात प्रसुतीची व्यवस्था करुन संपूर्ण रुग्णालय स्थलांतरीत करण्याचे आदेश महापौरांनी संबंधितांना दिले.या रुग्णालयात येणारे रुग्ण हे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील आहेत. त्यामुळे गरिब रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या या रुग्णालयाचा पुनर्विकास तातडीने करुन तिथे आवश्यक आणि अद्ययावत सेवा - सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. यासाठी आपण व्यक्तीश: लक्ष घालणार असल्याने आगामी दोन ते तीन वर्षातच हे अद्ययावत रुग्णालय वर्तकनगर परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध होईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका