शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कष्टकरी महिलांना लोकलची दारे बंदच, रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 07:16 IST

Mumbai Local News : नवरात्रीच्या निमित्ताने लोकलसेवा महिलांसाठी सुरू केली असली, तरी भाजीपाला, फळे, मासळीविक्रेत्या महिलांसाठी मात्र  लोकलची दारे  बंदच असल्याने अशा महिलां आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या  उदरनिर्वाहाचा प्रश्न कायम आहे.

मीरारोड -  नवरात्रीच्या निमित्ताने लोकलसेवा महिलांसाठी सुरू केली असली, तरी भाजीपाला, फळे, मासळीविक्रेत्या महिलांसाठी मात्र  लोकलची दारे  बंदच असल्याने अशा महिलां आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या  उदरनिर्वाहाचा प्रश्न कायम आहे.भाईंदरपासून थेट वसई-विरारपुढे सफाळे ते थेट पालघर-डहाणूपर्यंतच्या भागात भाजीपाला, फळे, फळांची  बागा्यती आहेत. तसेच मासेमारीचा व्यवसायही मोठा आहे. ग्रामीण भागातून स्थानिक महिला भाजीपाला विक्रीसाठी मुंबई,  उपनगरात लोकलने  प्रवास करतात. मीरा-भाईंदर, वसई-विरारमध्येही भाजीपाला, मासे, फळविक्रीसाठी रोज सफाळे-पालघर- डहाणूवरून महिला यायच्या. या व्यवसायावरच  त्यांच्या कुटुंबीयांचा उदरवनिर्वाह वर्षांनुवर्षे करत आहेत. परंतु, मार्चअखेरीस  कोरोनामुळे लोकल बंद करण्यात आल्या. शिवाय, बाजार-मंडईही बंद केल्या. तेव्हापासून महिलांचा व्यवसाय बंद  असून उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.काही महिलांनी पोटाची खळगी भरायची म्हणून खाजगी टेम्पोवाल्यांना  भाडे ठरवून जमेल तसा व्यवसाय सुरू ठेवण्याची धडपड चालवली. परंतु, टोपली भरून भाजीविक्रीला जाणाऱ्या महिलांना  टेम्पोचं लांबचं भाडं परवडणार नसल्याने लोकल सुरू होण्याची  प्रतीक्षा करत होत्या. नवरात्रीपासन महिलांनालोकलप्रवासाची राज्य सरकारने खुली  केल्याने आपल्याला व्यवसायाचा पुनश्य हरिओम होईल, अशी आशा कष्टकरी महिलांना होती. लोकलसेवा महिलांसाठी सुरू झाली, मात्र  कष्टकरी महिलांना प्रवासास मनाई केली जात आहे. त्यामुळे  रेल्वेने आम्हालाप्रवासाची परवनगी दिली पाहिजे, अशी मागणी  या महिनांनी केली आहे.

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक