शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची चिंता नको! मोडकसागर धरण पूर्ण भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 06:52 IST

जिल्ह्यात सरासरी ६९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. धरणांच्या परिसरातही पावसाचा जोर वाढलेला दिसून आला.

ठाणे : जिल्ह्यात मंगळवारीही पावसाचा जोर पाहायला मिळाला. काही ठिकाणी पावसाची रिपरिप होती. जिल्ह्यात सरासरी ६९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. धरणांच्या परिसरातही पावसाचा जोर वाढलेला दिसून आला.त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर धरण मंगळवारी रात्री ९.२४ वाजता पूर्ण क्षमतेने भरले धरणाखालील ४२ गावांना आधीच सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.मोडक सागर धरणातून दररोज मुंबईला सुमारे ४४० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागात पावसाचा जोर कमी-अधिक असून, धरण क्षेत्रात मात्र तो वाढलेला आहे. त्यामुळे पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. बारवी धरण, आंध्रा, मोडकसागर आदी गेल्या वर्षी १०० टक्के भरलेले होते.यंदा धरण क्षेत्रात पावसाला विलंब झाला आहे. आता बारवीत ७५.७३ टक्के पाणीसाठा झाला आहे. याप्रमाणेच या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ८६.५० मिमी पाऊस पडला आहे. यापैकी धरणातमंगळवारी ६२ मिमी पाऊस पडला.>तानसा-वैतरणातही८९ टक्के पाणीसाठाबारवी धरणाची पाणीपातळी आता ६९.६० मीटर झाली आहे. धरणात अजून तीन मीटर पाणीसाठा होणे अपेक्षित आहे. भातसात मंगळवारी ८५.५६ टक्के पाणीसाठा झाला असून धरणात ८८ मिमी पाऊस पडला. तर आंध्र धरणात २९ मिमी पाऊस पडल्याने ५६ टक्के पाणीसाठा आहे. मोडकसागरमध्ये ६९ मिमी पाऊस पडला. आता हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तानसात ९५ मिमी पाऊस पडला असून ८९ टक्के साठा तयार झाला आहे. मध्यवैतरणा धरणात ३९ मिमी पाऊस पडला असता या धरणात आतापर्यंत ८९.६१ टक्के पाणीसाठा झाला आहे.