डोंबिवली - डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवर असलेल्या आयकॉन हॉस्पिटल शेजारील डॉमिनोज पिझ्झाचे दुकान आगीत जळून भस्मसात झाले आहे. आज दुपारी ही आग लागली असून आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. ही आग नेमकी का लागली याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. काळ्या धुराचे लोट परिसरात पसरले आहेत. याच भागात आयकॉन हॉस्पिटल नावाचे हॉस्पिटलही आहे. ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. गॅसचा वास येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे. तसेच दुकानातून फटाक्यांसारखे आवाज येत असल्याचीही माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवान करत आहेत.
डॉमिनोज पिझ्झाचे दुकान आगीत जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 16:15 IST