तलवाडा : ग्रामीण व शहरी अशा दोन्ही विभागात महागाईची झळ सर्वसामान्यांना बसली आहे़ महागाई कमी होण्याएैवजी ती दिवसेंदिवस प्रत्येक वस्तूंमागे वाढत चाललेली आहे़ आधुनिकीकरणासाठी घराघरात गॅसशेगडीचा सर्रास वापर सुरु झाला़ परंतु ३००, ३३०, ३६५, ४६४ व आता डिसेंबर पर्यत ६२९ रूपयांना मिळणारा सिलेंडर वाढत वाढत आता ६८२ रुपयांवर गेला आहे़ आणि अवघ्या वीसच दिवसांसाठी तो पुरतो ़विक्रमगड सारख्या ग्रामीण भागातील लोक मजूरी करतात त्यांना न्याहारी, व तीनवेळेचे जेवण बनवावे लागते व एकत्र कुटुंब पध्दती असल्याने १० ते -१५ लोकांचे कुटुंब कमविणारे हात कमी त्यामुळे हे इंधनही वीस पंचवीस दिवसात संपते. महागाईमुळे ते कसे पुरवायचे? दरम्यान गगनाला भिडलेल्या महागाईची छळ सर्वसामान्य माणसाला जीवन जगणे असाहय करीत आहे़ या वाढणाऱ्या महागाईत सामान्यांकडील उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत कमी पडत असून बेताची मोलमजुरी व तुटपुंज्या शेतीच्या तुकडयावर उदरनिर्वाह कसा करावयाचा हा मोठा प्रश्न आहे़
घरगुती गॅसच्या किंमती ५३ रुपयांनी वाढल्या
By admin | Updated: January 6, 2016 00:57 IST