शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील युवकाचा लोकलमधून पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 17:59 IST

लोकलच्या गर्दीमुळे आणखी एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली-कोपर स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी ८.४० च्या सुमारास घडली. रजनीश प्रमोद सिंग (वय ३०) असे त्या युवकाचे नाव असून तो शलाका अपार्टमेंट, गांधीनगर डोंबिवली पूर्व, येथे कुटुंबासमवेत वास्तव्याला होता.

डोंबिवली : लोकलच्या गर्दीमुळे आणखी एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली-कोपर स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी ८.४० च्या सुमारास घडली. रजनीश प्रमोद सिंग (वय ३०) असे त्या युवकाचे नाव असून तो शलाका अपार्टमेंट, गांधीनगर डोंबिवली पूर्व, येथे कुटुंबासमवेत वास्तव्याला होता. तो डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान जलद मार्गाने मुंबईच्या दिशेने धावणा-या लोकलमधून प्रवास करत असतांना गर्दीमुळे तोल जावून लोकलमधून खाली पडला. परेल येथे एका खासगी कंपनीत तो व्यवस्थापक म्हणून काम करत होता.कल्याण- सीएसटी लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात जलद मार्गावर ८.४० मिनिटांनी फलाट क्रमांक ५ वर आली. त्या लोकलमध्ये रजनीश चढला. लोकलमध्ये खूप गर्दी असल्याने रजनीशला आत प्रवेश करता आला नाही. त्यामुळे लोकलच्या दरवाज्याला लटकून त्याचा प्रवास सुरु होता. मात्र प्रचंड गर्दीच्या रेटयामुळे रजनीशचा तोल गेला आणि तो लोकलमधून खाली पडला. त्याचा अपघात झाल्याचे समजताच सहप्रवाशांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना कळविले. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक गौरीप्रसाद हिरेमठ यांनी दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत रजनीशच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. यापूर्वी भावेश नकाते आणि धनश्री गोडवे आणि आता रजनीश या तिघाही डोंबिवलीकरांचा लोकलच्या गर्दीमुळे अपघाती मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलthaneठाणेdombivaliडोंबिवली