शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत शिवसेनेचे नेते, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा शनिवारी नागरी सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 18:19 IST

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्याने शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीनजीकच्या प्रिमियर मैदानावर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

डोंबिवली: पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्याने शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीनजीकच्या प्रिमियर मैदानावर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांच्यासह अन्य आठ मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी ‘लोकमत’ला दिली.खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर, भिवंडी आदी भागातील पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांनी तो उपक्रम यशस्वी होण्यासाठी कंबर कसली आहे. शनिवारी संध्याकाळी ५ वाजता सत्कार ठेवण्यात आला असून पालकमंत्री शिंदे यांच्या कार्यकर्ता ते पालकमंत्री हा प्रवास, तसेच राजकीय वाटचालीचा आढावा घेण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांना चांदीची तलवार, मानपत्र यासह विविध सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. ठाणे शहरातील पक्षाचे नेते, तसेच खासदार श्रीकांत शिंदेसह पक्षातील मान्यवर नेते, पदाधिकारी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध प्रतिष्ठीत मंडळींशी स्वत:हून चर्चा करत असून सोहळयाला आवर्जुन येण्यासाठी आवाहन करत आहेत. न भुतो असा सोहळा करण्यासाठी सर्वच शिवसैनिक पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी चंग बांधला असून पालकमंत्र्यांचा सोहळा जंगी करायचा असा मनसुबा बांधण्यात आला आहे.डोंबिवलीनजीक हा सोहळा संपन्न होणार असल्याने या परिसरातील राजकीय समीकरणांबद्दल सर्वपक्षांमध्ये तर्क वितर्कांना उधाण आले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वपक्षांमधील नेत्यांशी सौहार्दपूर्ण स्नेह असल्याचे सर्वश्रुत असल्याने शनिवारच्या सोहळयाला प्रचंड गर्दी होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी रचनेनूसार नियोजन करण्यात येत असून समाजामधील विविध संस्था, मान्यवर नागरिकांना त्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने डोंबिवलीच्या शिवसैनिक पदाधिका-यांवर सर्वाधिक जबाबदारी असून कल्याण, २७ गावांमधील पक्षाचे नेते, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. प्रिमियर मैदानावर सध्या कै. रतन पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा रंगल्या असून त्याचा समारोप दोन दिवस आधी झाल्यावर लगेचच शनिवारी तेथे पालकमंत्र्यांचा सत्कार सोहळा रंगणार असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे