शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली अत्यंत घाणेरडं शहर- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 17:43 IST

डोंबिवलीच्या बकालपणाला नागरिक जबाबदार आहेत

डोंबिवली: डोंबिवली हे घाणेरडं शहर आहे. शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण झालं आहे, रस्ते अरुंद आहेत. नेतेमंडळींनी अनेक बेकायदा बांधकाम केली आहेत. मात्र, या सर्व परिस्थितीला नागरिक जबाबदार आहेत, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.डोंबिवलीतील एका कार्यक्रमात गडकरी यांनी वेबीनॉरच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधला. यावेळी एका तरूणीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी यांनी डोंबिवली हे अत्यंत घाणेरडे शहर असल्याचे म्हटले. गडकरी म्हणाले की, सरकारकडून मेट्रो रेल्वे, जल वाहतूकीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच विविध रस्त्यांचे काम प्रगतीपथावर आहे. या सगळ्याचा योग्यरित्या उपयोग करून टिटवाळा, माळशेज या भागात स्मार्ट व्हिलेजची निर्मिती होणे गरजेचे आहे. डोंबिवलीत शहरातील समस्या भयानक आहेत. साक्षात परमेश्वर आला तरी या समस्या सुटणार नाहीत. तरीदेखील भाजपा सरकार त्यावर मात करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे गडकरी यांनी सांगितले. 

चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही महापौरांच्या मागे का लागत नाही?   रस्त्यांचे जाळे विणले की प्रगती होते. ज्याठिकाणी रस्ते होतात तिथे टाऊनशिप होतात, इंडस्ट्री आणि महाविद्यालयं येतात. त्यामुळे स्मार्ट शहर आकाराला येते. तुमच्या शहरातील 8 टक्के प्लॅस्टिक डांबरीकरणात टाकू शकता. भारत सरकारतर्फे त्यांचे नोटिफिकेशन लावले आहे. आता हे औपचारिक झाले आहे. तुमच्या येथील महिला बचतगटाच्या माध्यमातून प्लॅस्टिक गोळा करा. डांबराचा भाव 45 रूपये इतका आहे. प्लॉस्टिकचा दर  1 रूपये किलो आहे. महापौरांना विश्वासात घ्या. कल्याण-डोंबिवलीतील 8 टक्के प्लॉस्टिक डांबरात टाकल्यावर येथील प्लॅस्टिकचा प्रश्न सुटेल. पर्यावरणाच्यादृष्टीने हा चांगला निर्णय ठरेल. त्यासाठी तुम्ही तुमच्या महापौरांकडे पाठपुरावा केला पाहिजे, असे गडकरी यांनी सांगितले. 

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीdombivaliडोंबिवली