शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

डोंबिवलीत राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन, गुलाबप्रेमी सेल्फी काढण्यात दंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 18:38 IST

विविध रंगाच्या, विविध आकाराच्या, रंगछटा असलेल्या मनमोहक गुलाबांसोबत सेल्फी काढताना गुलाबप्रेमी हुरळून गेले होते

डोंबिवली- विविध रंगाच्या, विविध आकाराच्या, रंगछटा असलेल्या मनमोहक गुलाबांसोबत सेल्फी काढताना गुलाबप्रेमी हुरळून गेले होते. कोणी गुलाबांसोबत सेल्फी काढत होते, तर कुणी मनमोहक गुलाबांना आपल्या कॅमेºयात बंदिस्त करीत होते. निमित्त होते ते डोंबिवलीत भरविण्यात आलेल्या राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शनाचे.

डोंबिवलीकर मासिकाचे संपादक व राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून आनंद बालभवन, रामनगर येथे दोन दिवसीय गुलाब प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकांमध्ये गुलाबांचा प्रसार व्हावा, स्पर्धेसाठी थोडी फुले प्रदर्शनात मांडता येतात. परंतु आता स्पर्धा न ठेवल्याने जास्तीत जास्त गुलाबे प्रदर्शनात ठेवता आली आहेत. लोकांपर्यत जास्तीत जास्त गुलाबे पोहोचविणे, लोकांना वाटते की कुंडीत लावलेल्या गुलाबाला एक-दोन फुले आल्यावर झाडे मरते. पण त्यांची निगा कशी राखावी हे त्यांना समजावे हा प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. मेघना म्हसकर यांनी फुलांची मांडणी केलेली गुलाबे ही सगळ््यांच्या आकर्षणाचा विषय बनली होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेत्री तेजा देवकर, अभिनेता बबलू मुखर्जी, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. तन्वी पालव, भाग्यश्री मोटे यांनी ही प्रदर्शनाला भेट दिली.

प्रदर्शनात काय पाहाल ?या प्रदर्शनात ३५० प्रकारची ४ हजारांहून अधिक गुलाबे मांडण्यात आली आहेत. त्यामध्ये मिनीएचर प्रकारातील गोल्डन कॉईन, पिवळा मिनीएचर, रोझ मरीन, चारिश्मा, दुरंगीमधील रांगोली, रोनॉल्ड रिक्शन रोझ, लुईस एटीस, फॉकलोर, कॉलिफोनिया ड्रिमिंग, ड्रिमकम्स, फ्लोरिबंडा या प्रकारातील जांभळा मिनीएचर, अ‍ॅक्रोपॉली, शिवाऊ मॅक्वीन, केशरी या प्रकारातील कॅराबियन, कॅरीग्रट, लव्हर्स मिडींग, टच आॅफ क्लास, स्पाईस कॉफी, सुगंधी प्रकारात दम कार्डनी रोझ, द मकाठनी रोझ, जांभळा या प्रकारातील व्ह्यू ओसियन, सुधांशू, रेघांचा स्टिलभीफिस, रॉफ अ‍ॅण्ड रोल, ज्युलियो इगलिक्सिस, जर्दाळू गुलाब, पिवळ््या गुलाबांमध्ये सेंट पॅड्रीक, गोल्डमेडल, लॅडोरा, गुलाबी प्रकारात रूइई हॉपकिन्स, माक्वॅन कोनिन, पॅरोल, नेविली गिल्सन, लाल या प्रकारात स्पेशल मेरिट, अमालिया, वेटरसन होनर आणि रोझा व्हेरीडिफ्लोरा हा हिरवा गुलाब ही प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. याशिवाय चंद्रकांत मोरे यांनी तयार केलेल्या काही जाती प्रदर्शनात मांडल्या आहेत. त्यामध्ये चंद्रशेखर,स्वीट पिंक, जयंतराव,जनरल, वैद्य, दादासाहेब अशी फुले पाहायला मिळाली.

फुलांच्या नावाचा रंजक इतिहासहायब्रिड टी गुलाब आकाराने मोठे एका फांदीवर एक फूल असते. त्यांचा आकार आकर्षक, सुवासिक फुले साधारणपणे एच.टी प्रकाराची असतात. बाजारात या प्रकाराची फुले उपलब्ध असतात. चायना मध्ये चहा पावडरांचा व्यापार केला जात होता. त्यासोबत त्यांनी गुलाबांच्या फुलांच्या ही व्यापार सुरू केला. त्यामुळे गुलाबांला चहापावडरांचा वास येत असे. म्हणून या गुलाबाला टी असे नाव पडले. पांढरा कारगील गुलाब हा कारगील युध्द जिंकला त्याकाळात उत्पादित झाला होता. म्हणून त्याला कारगील गुलाब असे संबोधले जाते. श्री स्वामी समर्थ गुलाब यांचा हा इतिहास अत्यंत रंजक आहे. एखाद्या झाडाला जनेरियटिक आहार मिळाल्यास वेगळ््या जातीचे गुलाब झाडांला लागले. त्या फांदीवरचे डोळे काढून वेगळे झाड लावले जाते. त्यातून नवीन विविधता तयार झाली. या झाडांचे मूळ गे्रडीयिटर जातीचे आहे. दर तीन वर्षांनी हे फुल आपल्या आईच्या मूळ स्वरूपात जाते. आॅल इंडिया रोझ फेडरेशनने डॉ. म्हसकर यांना नाव देण्याची परवानगी दिली. त्यातूनच हे झाड पुढे श्री स्वामी समर्थ या नावाने नावारूपाला आले. ही झाडे अमेरिका, रशिया कोणत्याही देशात जा. याच नावाने ती मिळतील असे ही म्हसकर यांनी सांगितले.

तेजा देवकर म्हणाली, या प्रदर्शनामुळे एवढ्या प्रकारची गुलाबे असतात हे मला प्रथम समजले आहे. झाडांची निगा राखताना खूप खर्च येतो हा गैरसमज आहे. आपण घरातील छोट्या छोटया गोष्टी वापरून त्यांची निगा राखू शकतो हे या प्रदर्शनातून मला समजले. माझी बाग देखील आता अधिक चांगली फुलणार आहे. कारण या प्रदर्शनातून झाडांची निगा कशी राखायची हे मी शिकले आहे. गुलाबांचा सुगंध आपण विसरत चाललो आहे. पुढच्या पिढीपर्यंत हा सुगंध पोहोचल की नाही याबद्दल मला साशंकता वाटत आहे, अशी खंत तिने व्यक्त केली.