शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समन्वयकांना डोंबिवलीत नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 03:15 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

डोंबिवली : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे समन्वयक आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन पोलिसांकडून कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन केले जात असताना डोंबिवलीमधील काही समन्वयकांना पोलिसांनी १४९ अन्वये शांतताभंग न करण्याच्या नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वत्र आंदोलने सुरू आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २५ जुलैला कल्याणमध्ये तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यापूर्वी काही ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांनाही धक्काबुक्की आणि दमदाटी करण्याचा प्रकार घडला होता. आरक्षणासाठी पाठपुरावा न करणाºया मराठा आमदारांचा निषेध म्हणून तहसील कार्यालय परिसरात ठिय्या मांडलेल्या कार्यकर्त्यांनी मुंडण करून आमदारांचे प्रतीकात्मक श्राद्धही यावेळी घातले होते. तर, डोंबिवलीत आंदोलन करणाºया १६ जणांना अटक करण्यात आली होती.दरम्यान, ९ आॅगस्ट या क्रांतिदिनी गुरुवारी पुन्हा महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. यादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच शांतता अबाधित राहावी, यादृष्टीने पोलिसांकडून बैठका घेण्यात येत आहेत. यामध्ये स्थानिक पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून समन्वयक तसेच कार्यकर्त्यांना नोटिसाही जारी करण्यात आल्या आहेत. याला डोंबिवलीतील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक निलेश चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे. तर, कल्याणमधील समन्वयक श्याम आवारे यांनी मात्र पोलिसांकडून बैठका घेतल्या जात असून नोटिसा बजावल्या नसल्याचे सांगितले.>निकालानंतरच भूमिकामंगळवारी न्यायालयाचा जो निकाल लागेल, त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असे समन्वयक अरविंद मोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :marathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण