शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

डोंबिवलीत कचरा मुक्तीची मोहीम, 21 जानेवारीला स्वीकारला जाणार सर्व प्रकारचा कचरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 18:49 IST

कचरा मुक्तीसाठी प्रयत्न करणा-या अर्पणा कवी यांच्या पुढाकाराने इनरव्हील क्लबच्या वतीने कचरा मुक्तीची मोहिम राबविली जात आहे. सर्व प्रकारचा कचरा 21 तारखेला डोंबिवलीच्या ओंकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सकाळी 10 ते 12  वाजताच्या वेळेत स्वीकारला जाणार आहे. या मोहिमेत जवळपास 25 स्वयंसेवक व चार संस्था कार्यरत आहेत.

 डोंबिवली - कचरा मुक्तीसाठी प्रयत्न करणा-या अर्पणा कवी यांच्या पुढाकाराने इनरव्हील क्लबच्या वतीने कचरा मुक्तीची मोहिम राबविली जात आहे. सर्व प्रकारचा कचरा 21 तारखेला डोंबिवलीच्या ओंकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सकाळी 10 ते 12  वाजताच्या वेळेत स्वीकारला जाणार आहे. या मोहिमेत जवळपास 25 स्वयंसेवक व चार संस्था कार्यरत आहेत. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सगळ्य़ांनी त्याठिकाणी कचरा नेऊन दिल्यास कचरा मुक्तीची मोहिम पुढे जाण्यास हातभार लागणार असल्याचे आवाहन कवी यांनी केले आहे.     या मोहिमेत इनरव्हील क्लब सह रोटरी, रोटरॅक्ट व डोंबिवली मिलापनगर असोसिएशन यांचा सहभाग आहे. यापूर्वीही त्यांनी असा उपक्रम हाती घेतला होता. त्यातून त्यांनी 38 किलो ई कचरा, 43 किलो प्लॅस्टीकचा कचरा आणि 9 ते 1क् थर्माेकोलच्या शीट मिळाल्या होत्या. या उपक्रमासाठी कवी यांना ओंकार इंटरनॅशनल शाळेत एक जागा मिळाली आहे. या वेळीस ई कचरा, प्लॅस्टीक, थर्मोकोलसह कपडे, चप्पल बूट आदी स्वरुपाचा कचरा स्विकारला जाणार आहे. डोंबिवलीतील उर्जा फाऊंडेशनही प्लॅस्टीक मुक्तीसाठी कार्य करीत आहे. त्यांचे कार्य केवळ शहरी भागापूरते मर्यादीत आहे. त्यामुळे त्यांचा संपर्क डोंबिवली औद्योगिक वसाहतीत नाही. डोंबिवली औद्योगिक वसाहतीत जागरुक व सजग नागरीक कवी यांनी त्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या या उपक्रमास चार संस्थांची प्रबळ साथ मिळाली. सुरुवातीला 21 स्वयंसेवकांनी त्यात सहभाग घेतला. 21 जानेवारीच्या मोहिमेत 25 स्वयंसेवक सहभागी होतील असा दावा कवी यांनी केला आहे. गोळा करण्यात येणा:या ई कच:यावर गुंज ही संस्था शास्त्रोक्त प्रक्रिया करुन विल्हेवाट लावणार आहे. शीळ फाटा येथील सुजाता कोळमकर व मीनल लेले यांच्याकडून चालविण्यात येणा:या प्लॅस्टीक रिसायकलींग प्रकल्पात प्लॅस्टीक कचरा पाठविला जाणार आहे. सुका कच:यावर प्रक्रिया होण्यास त्यातून मदत होणार आहे. सुका कचरा कमी होण्यास हातभार लागणार आहे. उर्वरीत कच:यापासून खत तयार केले जाणार आहे. उर्जा फाऊंडेशन दर 4क् दिवसांनी प्लॅस्टीक कचरा गोळा करण्याचा ड्राईव्ह घेते. तर कवी यांच्या करवी चार संस्था या दर 3क् दिवसांनी हा ड्राईव्ह घेणार आहे. तसेच आठवडय़ाला दर गुरुवार हा सुक्या कच:यासाठी ठरवून दिला जाणार आहे. तर ओल्या कच:यासाठी आठवडय़ातील इतर दिवस ठरविले जाणार आहेत. महापालिकेने या उपक्रमाला हातभार लावणो गरजेचे आहे. महापालिकेकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याचे कारण महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते. त्याचा सहभाग असला तर ही मोहिम अधिक प्रभावी होऊ शकते असा दावा कवी यांनी केला आहे. पहिल्या ड्राईव्हला 48 नागरीकांनी प्रतिसाद दिला होता. आत्ता 21जानेवारीला हा प्रतिसाद अधिक संख्येने वाढण्याची शक्यता आयोजकांनी केली आहे. महापालिकेच्या इतर प्रभागातही अशा प्रकारचा ड्राईव्ह घेण्याचा मानस कवी व त्यांच्यावतीने काम करणा:या चारही संस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानdombivaliडोंबिवली