शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
4
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
5
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
6
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
7
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
8
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
9
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
10
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
11
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
12
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
13
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
14
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
15
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
16
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
17
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
18
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
19
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
20
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस

‘स्मार्ट सिटी’तून डोंबिवलीला डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 3:45 AM

कल्याण : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केडीएमसीने डोंबिवलीत एकही प्रकल्प हाती घेतलेला नाही. डोंबिवलीतील प्रकल्पांचा त्यात समावेश न केल्यास मनसेचा स्मार्ट सिटीला विरोध असेल, असा इशारा मनसेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी दिला आहे.

मुरलीधर भवारकल्याण : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केडीएमसीने डोंबिवलीत एकही प्रकल्प हाती घेतलेला नाही. डोंबिवलीतील प्रकल्पांचा त्यात समावेश न केल्यास मनसेचा स्मार्ट सिटीला विरोध असेल, असा इशारा मनसेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी दिला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाची बैठक बुधवारी सर्वोदय मॉलमधील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कार्यालयात झाली. याप्रसंगी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे संचालक व एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान, केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू, महापालिकेचे अधिकारी व स्मार्ट सिटी प्रकल्पातील संचालक व हळबे उपस्थित होते.आॅगस्ट २०१६ मध्ये केडीएमसीची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली. प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल २ हजार ३०० कोटी रुपये खर्चाचा आहे. त्यात एरिआ बेस डेव्हलपमेंट व पॅन सिटीतून २८ प्रकल्प साकारण्यात येतील. एरिया बेस डेव्हलपमेंटअंतर्गत प्राधान्याने कल्याण रेल्वेस्थानक परिसराचा विकास केला जाणार आहे. तर, पॅन सिटीत संपूर्ण शहरासाठी प्रकल्प असतील. परंतु, स्मार्ट सिटीतील सर्व प्रकल्प कल्याण केंद्रित आहेत. कल्याण स्थानक व कल्याण खाडी परिसराचा विकास केला जाणार आहे. ठाकुर्ली, डोंबिवली आणि कोपरमध्येही जवळपास १६ किलोमीटरचा खाडीकिनारा आहे. त्याच्या विकासासाठी तेथे पिकनिक स्पॉटचे आरक्षण आहे. तत्कालीन पर्यटनमंत्री जगन्नाथ पाटील यांच्या कार्यकाळात खाडीकिनारा विकासाचा प्रकल्प होता. मात्र, तो प्रत्यक्षात आला नाही. मात्र, स्मार्ट सिटीत डोंबिवलीच्या खाडीकिनारा विकासाला प्राधान्य दिलेले नाही. या प्रकल्पात महापौरांनी कल्याणलाच झुकते माप दिले आहे. ते केवळ कल्याणचे महापौर नसून डोंबिवलीचेही आहेत. सर्वसमावेशक विकासासाठी डोंबिवलीचाही या प्रकल्पात समावेश करावा, या मुद्यावरून हळबे यांच्याशी महापौरांची बैठकीतच शाब्दिक चकमक उडाली.स्मार्ट सिटीच्या अहवालास मान्यता मिळाल्याने त्यात आता डोंबिवलीचा प्रकल्प घेता येणार नाही, असा खुलासा मदान यांनी केला. त्यावर हळबे म्हणाले की, सत्ताधारी शिवसेनेचा अजेंडा असलेल्या सिटी पार्कचा समावेश स्मार्ट सिटीत करण्याचा ठराव महापौरांनी शिवसेना नगरसेवकांच्या मागणीवरून मंजूर केला. शिवसेनेला स्मार्ट सिटीतून त्यांच्या पक्षाचा अजेंडा राबवायचा आहे. कल्याणच्या विकासाला मनसेचा विरोध नाही. मात्र, विकासात डोंबिवलीलाही डावलू नका, अशी मनसेची मागणी आहे. डोंबिवलीचा समावेश न केल्यास स्मार्ट सिटीला मनसेचा विरोध असेल. तसेच स्मार्ट सिटीसाठी सरकारने केडीएमसीला दिलेला २८३ कोटींचा निधी रोखण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.>कोणत्या प्रकल्पांना मिळाली मंजुरीकल्याण स्थानक परिसराच्या विकासासाठी महापालिकेने यापूर्वीच मध्य रेल्वेशी सामंजस्य करार केला आहे. कल्याण स्थानक पूर्व व पश्चिमेच्या विकासासाठी तयार केलेल्या ४०० कोटींच्या प्रस्तावाच्या मास्टर प्लानला बुधवारच्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.स्टेशन परिसरातील पार्किंगची सुविधा, बस डेपो विकास, मेट्रो स्टेशन परिसर विकास करणे प्रस्तावित आहे. रस्ते व उड्डाणपूलही प्रस्तावित आहेत. या कामाची निविदा लवकरच काढण्यात येणार आहे.स्मार्ट सिटीत सिटी पार्कच्या समावेशास महासभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे त्यास स्मार्ट सिटी संचालकांनी मान्यता दिली. सिटी पार्कसाठी १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या एकूण खर्चाचा आकडा १०० कोटींनी वाढणार आहे.सरकारकडून मिळालेल्या स्मार्ट सिटीच्या निधीतून स्मार्ट सिटीचे कार्यालय सुरू करणे, प्रकल्प तयार करणे, कंपनी स्थापन करणे, सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत त्यासाठी वर्षभरात किमान एक कोटी रुपये खर्च झाले आहेत. या बैठकीत त्याचा लेखाजोखा मंजूर करण्यात आला.डोंबिवली स्टेशन परिसराच्या विकासाची निविदा लवकर काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. एकीकडे डोंबिवलीतील प्रकल्पांचा समावेश करता येणार नाही, असे सांगण्यात आल्याने मनसेने स्मार्ट सिटीला विरोध केला आहे. मात्र, स्थानक परिसरासाठी निविदा काढण्यात येणार असल्याने हा सगळा संभ्रम प्रशासनाने निर्माण केल्याचे यातून उघड होत आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका