शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

डोंबिवली सायकल क्लबच्या उपक्रमा:सायकल सफारीद्वारे वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 16:59 IST

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी उपक्रम झाले. झाडे लावा पर्यावरण जगवा या हेतूने डोंबिवली सायकल क्लब देखिल सायकल सफारी करतांना वृक्षारोपण करत आहे. यंदाचे क्लबचे पाचवे वर्ष असून सायकल चालवण्यासाठी येणा-या प्रत्येक सायकलपटूने बीया आणायच्या आणि त्या वाटेत रस्त्याच्या कडेला अथवा मोकळी जागा मिळेल तेथे लावयच्या असा उपक्रम असतो.

ठळक मुद्दे उपक्रमाचे ५ वे वर्षसायकलपटूंचा उत्स्फूर्त सहभाग

डोंबिवली: जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी उपक्रम झाले. झाडे लावा पर्यावरण जगवा या हेतूने डोंबिवली सायकल क्लब देखिल सायकल सफारी करतांना वृक्षारोपण करत आहे. यंदाचे क्लबचे पाचवे वर्ष असून सायकल चालवण्यासाठी येणा-या प्रत्येक सायकलपटूने बीया आणायच्या आणि त्या वाटेत रस्त्याच्या कडेला अथवा मोकळी जागा मिळेल तेथे लावयच्या असा उपक्रम असतो.यासंदर्भात क्लबचे संस्थापक डॉ. सुनिल पुणतांबेकर यांनी सांगितले की, यंदाचे ५ वे वर्ष असून सदस्यांना आता सांगायला लागत नाही. मे महिन्यापासूनच झाड गोळा करणे, रोप वाढवणे, बीया गोळा करुन ठेवणे असे नीत्याने करणारे सायकलपटू आहेत. पर्यावरण दिनानंतरचा पहिल्या रविवारपासून साधारणपणे पावसाळा संपेस्तोवर हा उपक्रम सुरू असतो. कोणी किती झाडे लावली अथवा किती बीया लावल्या यापेक्षा झाड लावण्यामध्ये आनंद व्यक्त केला जातो. अबालवृद्ध त्या उपक्रमात आवर्जून सहभागी होत असल्याचे ते म्हणाले.सायकल चालवतांना पर्यावरणाचा संदेश दिला जातोच पण तरीही आणखी वर्षभर सहजपणे पर्यावरणीय संतुलनासाठी जे करता येइल ते आवर्जून करण्याचा सदस्यांचा मानस असतो. अनेकांनी सायकलवर नो प्लास्टिक, नो हॉर्न ओके प्लीज असे संदेश देणारे फलक लावले आहेत. आपापल्या परीने प्रत्येकाने स्वत:हून उपक्रम करणे, त्यात सहभागी होणे आवश्यक असल्याचे डॉ. पुणतांबेकर म्हणाले. क्लबचे सदस्य जाणकार असून त्यांना पर्यावरणाची आवड आहे, हे त्यांच्या कृतीतून स्पष्ट होते असे ते म्हणाले. अनेकांनी वड, पिंपळ रोप लावली आहेत. तर काहींनी आंबा, जांभुळ, पेरु, कोणी फुलझाड, तर कोणी अन्य वृक्ष लागवड करत असतात. डोंबिवलीच्या पंचक्रोशीतच नव्हे तर जिल्ह्यात आणि अष्टविनायक मार्गावर देखिल हा उपक्रम काहींनी केला आहे. काही ठिकाणी चांगल्या झाडांमध्ये त्याचे रुपांतर झाल्याचे ते म्हणाले. सायकल घेतांना स्वत:ला पिण्यासाठी पाण्याची बाटली घेतांनाच आणखी एक बाटली व खड्डा खणण्यासाठी सळई अथवा चांगला बांबू घ्यायचा ही जबाबदारी देखिल आपापल्या स्तरावर सगळे विभागून घेतात. त्यामुळे सामुहिक पणे वृक्ष लागवड केली जात असून त्यात सातत्य आहे हे क्लबच्या सदस्यांचे विशेष असल्याचे ते सांगतात.

 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवली