शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

डोंबिवली : मराठी भाषेतील विज्ञान पुस्तक प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 14:59 IST

टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, डोंबिवलीतर्फे वाचनसंस्कृती वाढावी याकरिता मराठी भाषेतील विज्ञानाची पुस्तके आणि वैचारिक पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे

डोंबिवली- टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, डोंबिवलीतर्फे वाचनसंस्कृती वाढावी याकरिता मराठी भाषेतील विज्ञानाची पुस्तके आणि वैचारिक पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे. टिळकनगर शाळेच्या पटांगणात या दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 21 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात आले आहे.

डोंबिवलीतील 15 शाळांना या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. साधारणपणो अडीच हजार पुस्तके या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. रेणु दांडेकर, अच्युत गोडबोले, सुबोध जावडेकर, यासारख्या प्रथितयश लेखकांची पुस्तके या प्रदर्शनाता पाहायला मिळत आहे. या प्रदर्शनात 50 टक्के पुस्तके ही मराठी भाषेतील आहेत. मराठी भाषेत लिहिलेली विज्ञानाची पुस्तके फार कमी आहेत. इंग्रजी भाषेत मात्र विज्ञानाच्या पुस्तकांवर विपुल लेखन झाले आहे. मराठी भाषेतील विज्ञानाच्या पुस्तकांची निर्मिती व्हावी हा देखील एक उद्देश हे प्रदर्शन भरविण्यामागे असल्याचे शाळेचे पदाधिकारी अविनाश बोंद्रे यांनी सांगितले.  

या प्रदर्शनात मूलभूत विज्ञान, खगोलशास्त्र व आकाश निरीक्षण, शरीरशास्त्र आणि आरोग्य, पर्यावरण निसर्ग, प्रयोग-प्रकल्प का व कसे, वैज्ञानिक चरित्रे, विज्ञानाचा इतिहास, विज्ञान कथा, चरित्रे, माहितीपर, सामान्य ज्ञान, गणित इत्यादी विषयांची पुस्तकांची मांडण्यात आली आहे.