लोकमत न्यूज नेटवर्क विरार : कुत्र्यांनी एका मुलाचे लचके तोडले आहेत. एका आठवड्यात नवापूर परिसरातील ही तिसरी घटना आहे. वसई महानगरपालिकेकडून मोकाट कुत्र्यांना पकडून समुद्र किनाऱ्यावर सोडण्यात येत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. शनिवारी समुद्राजवळ असलेल्या शेतीत आपल्या परिवारासोबत कामास गेलेल्या सदू लहान्या बरात या १० वर्षाच्या मुलाचे मोकाट कुत्र्याने लचके तोडले. गंभीररित्या जखमी झाल्या सदूवर कुत्र्यांनी मागून येऊन हल्ला चढविला होता. मागील अनेक दिवसांपासून पालिका प्रशासन मोठ्या प्रमाणात कचरा आणून खाडी भागातील तिवरांच्या जंगलात जाळते आहे. यात अनेक ठिकाणाहून पकडलेली कुत्रीही सोडली जात आहेत. हे थांबविलेनाही तर या कुत्र्यांना मारूनत्यांची पालिका कार्यालयापर्यंत अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
कुत्र्यांनी तोडले मुलाचे लचके
By admin | Updated: May 8, 2017 05:49 IST