ठाण्यातही भटक्या कुत्र्यांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:02 AM2018-12-10T00:02:12+5:302018-12-10T00:02:25+5:30

ठाण्यात भटका कुत्रा चावा घेण्याचे दिवसाचे प्रमाण हे ५० ते ६० असल्याचे समोर आले आहे. त्यात पालिकेकडून भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्यानंतरही त्यांची संख्या आजघडीला लाखाच्या घरात गेल्याची माहितीही एका अहवालातून समोर आली आहे.

Dogfight panic in Thane | ठाण्यातही भटक्या कुत्र्यांची दहशत

ठाण्यातही भटक्या कुत्र्यांची दहशत

Next

ठाणे : उल्हासनगर मध्ये भटका कुत्र्याच्या चाव्यामुळे सात मुले जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यानंतर आता प्रत्येक शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या पुन्हा आ वासून उभी राहिली आहे. ठाण्यात भटका कुत्रा चावा घेण्याचे दिवसाचे प्रमाण हे ५० ते ६० असल्याचे समोर आले आहे. त्यात पालिकेकडून भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्यानंतरही त्यांची संख्या आजघडीला लाखाच्या घरात गेल्याची माहितीही एका अहवालातून समोर आली आहे.

शुक्रवारी उल्हासनगरच्या कॅम्प नं. ३ मध्ये भटक्या कुत्र्याच्य चाव्यामुळे सात मुले जमखी झाल्याची घटना घडली. परंतु, एकाच वेळेस सात जणांना चावा घेतल्याने ही घटना चर्चिली गेली आहे. परंतु एखाद दुसरी घटना असती तर ती उघड झाली नसती. त्याचे कारणही तसेच आहे. अनेक जण कुत्र्याने चावा घेतल्यास खाजगी रुग्णालयात उपचार घेतात. त्यामुळे त्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी होत नाही. जे रुग्ण पालिकेकडे उपचार घेतात. त्यांचीच नोंद पालिकेच्या दप्तरी होत असते. त्यामुळे महापालिकेच्या दप्तरी ही नोंद केवळ ४ ते ५ पर्यंतच कधी कधी असते. परंतु, वास्तविक हा आकडा ५० ते ६० च्या घरात असल्याची माहिती भटक्या कुत्र्यांवर अभ्यास करणारे सत्यजीत शहा यांनी सांगितले.

ठाण्यात महागिरी कोळीवाड्यातील भारती कुटुंबीयांनी तर या अशा भटक्या कुत्र्यांचा धसकाच घेतला आहे, याच कुटुंबियातील १० वर्षीय आर्यनला मागील महिन्यात दुकानात गेला असता त्याच्या पाठीवर चढून एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. यामुळे आजही त्याच्या मनात या भटक्या कुत्र्यांविषयी भीती कायम आहे. त्यातही लहान मुलांवरील भटक्या कुत्र्यांचे हल्ले हे वाढल्याचे दिसत आहे.

निर्बिजीकरणानंतरही संख्येत वाढ
श्वानदंशाच्या घटनांपैकी ८० टक्के घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील बालकांचा समावेश असल्याचेही शहा यांनी सांगितले. ठाणे शहरात अंदाजे जवळपास एक लाख एवढी भटक्या कुत्र्यांची संख्या असण्याची शक्यता असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

ठाणे पालिकेचा उदासीनपणा हे सर्वात मोठे कारण समोर येत असून निर्बिजीकरण झाल्यानंतरही भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही आजही भटक्या कुत्र्यांची गणना मात्र पालिकेकडून झालेली नाही. दीड वर्षापूर्वी या कुत्र्यांची गणना करण्याचे पालिकेने स्पष्ट केले होते. परंतु, अद्यापही ती झालेली नाही.

Web Title: Dogfight panic in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.