शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
3
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
4
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
5
मुलाखतीदरम्यान 'तो' प्रश्न विचारताच प्रशांत किशोर चिडले, काम सोडतो म्हणाले; नेमकं काय घडलं?
6
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
7
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
8
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; SBI चमकला, पॉवरग्रिडमध्ये मोठी घसरण
10
मतदान केलं नाही म्हणून पक्षाने पाठवली नोटीस; BJP खासदार म्हणाले, "सभेला बोलवलं नाही तर मी..."
11
असं काय झालं की RBIनं सरकारला दिले ₹२.११ लाख कोटी, इमर्जन्सी रिस्क बफर का वाढवला?
12
किर्तीकर - मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून वाद मिटवावा; दरेकर, शिशिर शिंदेंच्या आरोपानंतर केसरकरांचा सल्ला
13
बिघाड असलेली पोर्शे वडिलानेच दिली आपल्या लेकाच्या ताब्यात; विशाल अग्रवालसह तिघांची पोलिस कोठडीत रवानगी
14
मुकेश अंबानींच्या ₹१५००० कोटींच्या अँटिलियापेक्षाही मोठ्या घरात राहतात राधिकाराजे गायकवाड; माहितीये कोण आहेत त्या?
15
पुण्यातील पोर्शेच्या घटनेनंतर यूपी पोलीस ॲक्शनमोडवर; २ मुलांच्या मृत्यू प्रकरणी एकाला ६ महिन्यांनंतर अटक
16
कशी आहे शाहरुखची प्रकृती? जुही चावलाने दिले हेल्थ अपडेट; म्हणाली, 'देवाच्या मनात असेल तर...'
17
सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला
18
आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस
19
मुंबईपेक्षा दिल्लीतील राहणीमान अधिक चांगले; ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या निर्देशांकात भारतीय शहरे माघारली
20
चोरी गेलेले, हरवलेले हजारो मोबाइल दिले परत; सीईआयआर पोर्टलच्या मदतीने केला तपास

श्वान निर्बिजीकरण शस्त्रक्रिया बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:51 AM

पाच महिन्यांपासून प्रक्रिया थांबली; वाढीव खर्चाला स्थायीच्या मंजुरीची प्रतीक्षा, भटक्या कुत्र्यांची दहशत

ठाणे : ठाण्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत असतांना ऑगस्टपासून त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्थायी समितीमध्ये या संदर्भातील वाढीव खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता. परंतु, अद्यापही त्याला मंजुरी न मिळाल्याने ही प्रक्रिया थांबल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. यामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू शकते, अशी भितीही आता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, हा प्रस्ताव रोखला कोणी, त्या मागे नेमका काय हेतू आहे, याची माहिती मात्र गुलदस्त्यात आहे.ठाण्यातील भटक्या कुत्र्यांची संख्या ही आजही कमी होतांना दिसत नाही. पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत २००४ पासून आतापर्यंत ५९ हजाराहून अधिक भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. परंतु, अद्यापही सुमारे १५ हजार भटक्या कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया बाकी असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मागील वर्षी एकाच महिन्यात त्यांनी १३०० जणांचे लचके तोडल्याच्या घटना घडल्या होत्या. परंतु, शहरातील भटक्या कुत्र्यांचा कित्येक वर्षांपासूनचा सर्व्हे होणे अद्याप कागदावरच असल्याने शहरात आजघडीला नेमके किती कुत्रे आहेत, याचीच माहितीच आरोग्य विभागाला होऊ शकलेली नाही. सर्व्हे करण्यासाठीच्या प्रस्तावाला २०१५ मध्ये मंजुरी मिळालेली आहे. परंतु, अद्यापही तसा तो सुरू झालेला नाही. दरम्यान भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी तीन वर्षासाठी दीड कोटींची तरतूद केली होती. परंतु, आॅगस्ट महिन्यापासून या शस्त्रक्रिया थांबल्या असल्याची माहिती समोर आली आहे.अद्यापही १५ हजाराहून अधिक कुत्र्यांवर शस्त्रक्रिया शिल्लकपालिकेच्या आकडेवारीनुसार शहरातील सुमारे १५ हजाराहून अधिक कुत्र्यांवर अद्यापही शस्त्रक्रिया होणे शिल्लक आहे. तरी प्रत्यक्षात पालिका हद्दीत सुमारे ७५ ते ८० हजार भटक्या कुत्र्यांची संख्या असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. असे असतांना आता मागील पाच महिन्यापासून शस्त्रक्रियांची प्रक्रियाच थांबली असल्याने त्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान जी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. ती संपली असल्याने वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता. परंतु,पाच महिने उलटूनही त्याला अद्यापही मंजुरी मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. एकूणच आता हा प्रस्ताव रोखला कोणी, कशासाठी यामागची कारणे मात्र गुलदस्त्यात आहेत.सर्वांचीच अळिमिळी गुपचिळीस्थायी समितीच्या काही सदस्यांशी यासंदर्भात चर्चा केली असता, आळीमिळी गुपचीळीचीच भूमिका या सदस्यांनी घेतली आहे. तर महापालिकेच्या संबधीत विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर भाष्य करण्याचे टाळले आहे.ऑगस्टपर्यंत ३ हजार कुत्र्यांवर शस्त्रक्रियाकुत्र्यांची जनन क्षमता लक्षात घेता अंदाजे प्रती महिना २५० ते ३०० कुत्र्यांवर प्रजनन प्रतिबंधक शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. त्यानुसार आॅगस्टपर्यंत तीन हजार भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

टॅग्स :dogकुत्राthaneठाणे