शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात श्वानाला जिवंत जाळले: दोन जुळया भावांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 17:00 IST

ठाणे शहरातील राबोडी भागातील एका आजारी श्वानाला जिवंत जाळल्याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन जुळया भावांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहरातील राबोडी भागातील एका आजारी श्वानाला जिवंत जाळल्याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन जुळया भावांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हे दोघेही अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.गेल्या काही दिवसांपासून हे श्वानाचे पिल्लू आजारी होते. त्याच्यावर एका प्राणी मित्र संघटनेकडून उपचारही सुरु होते. मात्र, बुधवारी रात्री त्याला कोणीतरी जाळल्याची माहिती राबोडी पोलिसांना दिली. त्याचवेळी सिटीझन्स फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन फाऊंडेशनने याप्रकरणी अ‍ॅनिमल क्रुएलटी अ‍ॅक्ट आणि भारतीय दंड विधानाच्या कलम ४२९ नुसार राबोडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. घटनास्थळी अर्धवट जळालेल्या अवस्थेतील हा श्वान आढळला. त्याला सिटीझन्स फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन फाऊंडेशनच्या सदस्यांनी एका पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखलही केले. मात्र, त्याच दरम्यान त्याचा मृत्यु झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या पथकाने या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राबोडीतील मसनवाडा भागात याप्रकरणी चौकशी केली. तेंव्हा सात वर्षीय दोन अल्पवयीन जुळया मुलांनी या श्वानाला जाळल्याचे विदारक सत्य समोर आले. आता या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीdogकुत्रा