विविध पॅथीच्या डॉक्टरांनी वादात न पडता एकत्र येऊन रूग्णाचे कल्याण करावे- सच्चिदानंद शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 04:39 PM2020-02-15T16:39:36+5:302020-02-15T16:39:53+5:30

आपल्याकडे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. अन्नधान्य आणि भाजीपाल्यावर रासायनिक द्रव्य फ वारली जातात.

Doctors of various pathways should come together without any controversy and welfare of patient - Sachidanand Sheved | विविध पॅथीच्या डॉक्टरांनी वादात न पडता एकत्र येऊन रूग्णाचे कल्याण करावे- सच्चिदानंद शेवडे

विविध पॅथीच्या डॉक्टरांनी वादात न पडता एकत्र येऊन रूग्णाचे कल्याण करावे- सच्चिदानंद शेवडे

Next

डोंबिवली- आपल्याकडे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. अन्नधान्य आणि भाजीपाल्यावर रासायनिक द्रव्य फ वारली जातात. त्यामुळे चांगले काय आहे याबाबत सामान्यांमध्ये संभ्रम आहे. माझी पॅथी चांगली असे प्रत्येक डॉक्टर बोलत असतो. त्यांनी या वादात न पडता एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जायला हवे आहे तेव्हाच रु ग्णाचे कल्याण होईल, असे मत ज्येष्ठ साहित्यीक सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.

गोपालकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कॅन्सरच्या जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन केले होते. ही रॅली टिळक चौक येथून सुरूवात झाली. त्यानंतर राजेंद्र प्रसाद मार्ग, चार रस्ता, मानपाडा रोड, बाजीप्रभू चौक, फडके रोड या मार्गी फिरून आप्पा दातार चौकात तिचा समारोप झाला. मैत्री व्हाट्स अॅप गुपच्या महिलांनी कॅन्सर जनजागृतीसाठी पथनाटय सादर केले. फिनिक्सचे मनोगत या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात करून पुन्हा आयुष्यात उभ्या राहिलेल्या महिलांनी आपले अनुभव यात मांडले आहे. यावेळी व्यासपीठावर डॉ. तेजिंदर सिंग, कर्करोगतज्ञ डॉ. अनिल हेरूर, डॉ. मंगेश देशापांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. शेवडे म्हणाले, कॅन्सर हा रोग खेकडय़ासारखा दोन्ही बाजूने जखडणारा आहे. जंकफूड खाऊ नये असे आपण इतरांना सांगतो पण आपण ही तसे वागतो का यांचा विचार केला पाहिजे. जे काम चांगले चालते त्याठिकाणी देवांचे अधिष्ठान असते. लोकांना चांगल्या प्रसंगात देवाची आठवण होत नाही मात्र दुखाचा डोंगर कोसळल्यावर मीच का असा प्रश्न त्यांना पडतो. देवाची आठवण दुखात होते हे ही काही कमी नाही. 

संकट आल्यावर माणूस खचतो त्यातून त्यांना उभारी मिळणो गरजेचे आहे. मैत्री ग्रुप क र्करोगांनी जखडलेल्या माणसाला त्यातून उभारी देण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉ. हेरूर यांच्यासारखी माणसे समाजात आहेत. त्यांना आपण समाजाचे देणो लागतो याची जाणीव आहे. ते उत्तम काम करीत आहे. त्यांच्या चांगल्या कामाला आपणही हात पुढे करायचा असतो. मैत्री ग्रुपने जे पथनाटय सादर केल्या त्यात त्यानी तंबाखू, सिगारेट, दारू यांचे सेवन करू नये असा संदेश दिला. याशिवाय जंकफूडपासून लांब राहण्याचा सल्ला ही दिला. मात्र स्त्रियांनी काय करावे हे सांगितले नाही.

कर्करोगाच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या रॅलीत ‘लढा कॅन्सर  मु्क्तीचा या रे या सारे या, गजाननाला आळवुया, जन मनाला समजावू या मिळूनी सारे लढवू या कर्करोगाला पळवू या आणि तंबाखू, सिगारेट, दारूच्या जाणार नाही वाटेला स्वस्थ ठेवू या आपल्या तन मन धनाला’ यासारख्या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.

डॉ. हेरूर म्हणाले, कर्करोगाचे लवकर निदान म्हणजेच जीवदान आहे. त्यांची दहा लक्षणो आहेत. ही लक्षणो दिल्यास त्वरीत तपासणी केली पाहिजे. त्यामध्ये एखादी न भरून येणारी जखम, रक्तस्त्रव होणो, न दुखणारी गाठ, अन्न गिळताना त्रस होणो, मल-मूत्र विसजर्नात बदल, तीळ वा चामखीळीचा आकारात बदल, दीर्घकाळ खोकला आणि आवाजात बदल, अकारण थकवा, वजनात घट, सतत पोटात वा अस्वस्थ वाटणो, अकारण ताप ही लक्षणो आहेत. सरकार सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाही. त्यामुळे समाजाने ही थोडीफार जबाबदारी घेण्याची गरज आहे. रूग्णसेवा ही देवापेक्षा ही मोठी सेवा आहे.

Web Title: Doctors of various pathways should come together without any controversy and welfare of patient - Sachidanand Sheved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.