शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांना वेतनकपातीचे ‘पंचिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 06:26 IST

मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त बळीराम पवार यांनी दि. १ एप्रिलपासून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक पंचिंग मशीनवरील कामाच्या उपस्थितीचा कालावधी तपासून वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील बहुतांश डॉक्टरांनी कामावर येताना पंचिंग केले आहे.

- राजू काळेभार्इंदर  - मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त बळीराम पवार यांनी दि. १ एप्रिलपासून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक पंचिंग मशीनवरील कामाच्या उपस्थितीचा कालावधी तपासून वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील बहुतांश डॉक्टरांनी कामावर येताना पंचिंग केले आहे. मात्र, कामावरून जाताना पंचिंग केले नसल्याने त्यांच्यावर वेतनकपातीची टांगती तलवार आहे.यापूर्वी पालिका प्रशासनाने सर्व कार्यालयांत बायोमेट्रीक पंचिंग मशीनद्वारे हजेरी लावण्याची सोय सर्व अधिकारी व कर्मचाºयांना उपलब्ध करून दिली. मात्र, माजी आयुक्त अच्युत हांगे यांनी वरिष्ठ अधिकारी, अभियंते व डॉक्टर्स यांना पंचिंगमधून वगळण्याची सूट दिली होती. या सवलतीचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने विद्यमान आयुक्त बळीराम पवार यांनी ही सूट रद्द करून सरसकट सर्व अधिकारी व कर्मचाºयांना १ एप्रिलपासून बायोमेट्रीक पंचिंग मशीनद्वारे कामावर उपस्थित असल्याचा कालावधी तपासून वेतन देण्याचा निर्णय लागू केला. विशेष म्हणजे पवार यांनी स्वत:पासून या नियमाची अंमलबजावणी सुरू केली. यामुळे मिळालेल्या सवलतीचा गैरवापर करणारे वरिष्ठ अधिकारी, अभियंते व डॉक्टर यांची पंचाईत झाली आहे. या पंचिंगसाठी ज्या कर्मचाºयांनी अद्याप आधारकार्डचा तपशील संगणक विभागाकडे दिला नव्हता, अशा कर्मचारी व अधिकाºयांची सोमवारी आधार क्रमांक लिंक करण्यासाठी धावपळ उडाली.जोशी रुग्णालयातील डॉक्टरांनी केवळ कामावर हजर होताना पंचिंग केले असून कामाची वेळ संपल्यानंतर पंचिंग करण्याकडे दुर्लक्ष केले असल्याने त्यांच्या वेतनावरही गदा आली आहे. यामुळे कर्मचाºयांचे महिनाअखेरीस दिले जाणारे वेतन अद्याप आस्थापना विभागाकडून खात्यात जमा झालेले नाही. लेटलतीफ कर्मचाºयांच्या तीन लेटमार्कनंतर त्यांच्या एका किरकोळ रजेवर संक्रांत येणार आहे.वेतन अद्यापजमा झालेले नाहीजोशी रुग्णालयातील डॉक्टरांनी केवळ कामावर हजर होताना पंचिंग केले असून कामाची वेळ संपल्यानंतर पंचिंग करण्याकडे दुर्लक्ष केले असल्याने त्यांच्या वेतनावरही गदा आली आहे. यामुळे कर्मचाºयांचे महिनाअखेरीस दिले जाणारे वेतन अद्याप आस्थापना विभागाकडून खात्यात जमा झालेले नाही.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर