शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

Doctors Day: डॉ. संतोष कदम कोरोनावर मात करून पुन्हा टास्क फोर्समध्ये; रुग्णसेवेसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 01:16 IST

घरातूनच होस्ट केले डॉक्टरांचे वेबिनार

स्नेहा पावसकर 

ठाणे : ठाण्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनासोबत डॉक्टरांचा ‘ठाणे कोविड टास्क फोर्स’ काम करीत असून त्याचे कोआॅर्डिनेटर डॉ. संतोष कदम हे कोरोनाला हरवून पुन्हा एकदा रुग्णसेवेकरिता सज्ज झाले आहेत.

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी विविध बैठका, वेबिनार घेण्याबरोबरच स्वत:ची प्रॅक्टिस करतानाच डॉ. कदम स्वत: कोविड पॉझिटिव्ह झाले. मात्र खरेखुरे कोरोना योद्धा असल्याने ते कोरोनाला हरवून पुन्हा परतलेत आहेत. आतापर्यंत ठाणे शहरातील सुमारे ६० डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह झाले असून त्यातील चार जणांचा मृत्यू झाला. उर्वरित सर्व बरे झाले. यांच्यापैकीच एक आणि इंडियन मेडिकल असोसिएशन ठाण्याचे सेक्रेटरी डॉ. कदम एप्रिलपासून १०-११ डॉक्टरांच्या ठाणे कोविड टास्क फोर्ससह महापालिका प्रशासनासोबत काम करीत आहेत. डॉ. कदम यांनी कोआॅर्डिनेटर म्हणून डिस्चार्ज गाइडलाईन ठरवणे, कोणते हॉस्पिटल कोविडसाठी योग्य आहे हे ठरवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले. शहरातील १७ खाजगी हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल निश्चित करण्यात या टास्क फोर्सचा मोठा वाटा आहे. तसेच कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात डॉक्टरांनाही मास्क, ग्लोव्ज, पीपीई कीट, सॅनिटाझर पुरेसे उपलब्ध होत नव्हते. डॉ. कदम यांनी अतिशय अल्पदरात थेट फॅक्टरीतूनच या वस्तू उपलब्ध केल्या. फोर्सने महाराष्ट्र टास्क फोर्ससोबत मिळून डॉक्टरांसाठी एक वेबिनार ५ जूनला आयोजित केला होता. मात्र याचदरम्यान त्यांना त्रास जाणवल्याने ते स्वत: कोविड पॉझिटिव्ह आले. परंतु तशा परिस्थितीतही घरातूनच वेबिनारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर त्रास वाढल्याने रूग्णालयात दाखल होऊन त्यांनी उपचार घेतले. १३ जूनला डॉ. कदम यांना डिस्चार्ज मिळाला.कोरोना कोणालाही होऊ शकतो, फक्त योग्य ती काळजी घेतली तर नक्की बरा होतो. माझ्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या सामान्य रूग्णांसोबतच सोसायटीत, परिचयातील, सहकारी डॉक्टरांपैकी कोणी कोविडसदृश्य आढळल्यास त्यांना मार्गदर्शनाबरोबरच उपचारार्थ रूग्णालयात अ‍ॅडमिट व्हायला मदत करतो, त्यांना मानसिक आधार देतो, डॉक्टर या नात्याने ते माझे कर्तव्य आहे. ते करीत राहीन. ठाण्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनासोबत मिळून कामही करीत राहू. - डॉ. संतोष कदम, कोआॅर्डिनेटर, ठाणे कोविड टास्क फोर्स

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस