शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजांची स्तुती केली म्हणून गांधीजींच्या राष्ट्रप्रेमावर आपण शंका घेतो का?: कपिल पाटील

By नितीन पंडित | Updated: April 7, 2023 15:29 IST

सावरकरांचे विचार समाजात पोहचविण्यासाठी हि गौरव यात्रा...केंद्रीय मंत्री कपिल पाटील

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: महात्मा गांधीजींनी पहिल्या महायुद्धात इंग्रजांची स्तुती करीत तरुणांना सैन्यात दाखल होण्याचे आवाहन केले होते म्हणून काय आपण त्यांच्या राष्ट्रप्रेमावर शंका घेतो का? तर त्यामागे त्यांचा उद्देश शुद्ध होता. इंग्रजांनी पहिल्या महायुद्धात भारताने सहकार्य केल्यास देशाला लवकर स्वतंत्र मिळेल ही भावना होती,तशीच भावना स्वातंत्र्यवीर सावरकरांची होती. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागण्या मागचा हेतू हा कारागृहात बंदी राहून देश स्वतंत्र करता येऊ शकत नाही जर बाहेर राहिल्यास स्वातंत्र्यलढा अधिक जोमाने उभा करता येऊ शकतो आणि याच भावनेने त्यांनी इंग्रजांची माफी मागितली होती असे वक्तव्य केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.शुक्रवारी ते काल्हेर येथे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आयोजित सावरकर गौरव यात्रेच्या बाईक रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

या प्रसंगी शिवसेना उपनेते प्रकाश पाटील,आमदार शांताराम मोरे,भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष पि के म्हात्रे,हरिश्चंद्र भोईर,राजेंद्र भोईर,श्रीधर पाटील,निलेश गुरव यांसह मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.काल्हेर ते कोनगाव या दरम्यान आयोजित या रॅलीत सावरकर चित्ररथ सहभागी केले होते. काँग्रेस पक्षाचे नाव न घेता काही तथाकथित पक्षातील स्वतःला नेते म्हणून घेणारी लोकं स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जी टीका करतात ती चुकीची असून समाजा मध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम या तथाकथित पक्षातील मंडळींकडून केला जात आहे अशी टीका देखील पाटील यांनी केली आहे.आणि त्याच करता भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्या वतीने महाराष्ट्रात सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेंचा आयोजन करून सावरकरांचा विचार सावरकरांचा इतिहास हा तरुणांमध्ये सर्व समाजामध्ये पोहोचवण्याचं काम सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून केलं जात असल्याचे प्रतिपादन पाटील यांनी केले.सावरकरांनी त्यांच्या राष्ट्र कार्याने स्वतःची दहशत निर्माण केली होती.

आणि त्या मुळे हे तथाकथित पक्षातील नेते मंडळी भयग्रस्त झाले असून स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी आम्ही सावरकर या माध्यमातून समाजामध्ये वावरत असताना त्यांची सुद्धा दहशत तथाकथित पक्षाची नेत्यामंडळींना नक्कीच राहील.सावरकरांनी त्यांच्या कार्यातून निर्माण केलेली हि दहशत आहे,त्यामुळे तथाकथित पक्षातील लोक सावरकरांचा वारंवार अपमान करून सावरकरांचे विचार संकुचित करण्याचा प्रयत्न करीत आहेत असेही शेवटी पाटील यावेळी म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटील