शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकारांतर्गत तपशील घ्यायचाच नाही का? कार्यकर्ते संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 06:21 IST

आरटीआय कार्यकर्त्यांना संशयित आणि ब्लॅकमेलर ठरवत ठाणे महापालिकेने सखोल चौकशी करून संबधीतांवर कठोर कारवाईची मागणी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांकडे केल्याचे पडसाद शहरात उमटू लागले असून यापुढे पालिकेकडे माहिती विचारायची नाही का? असा संतप्त सवाल माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे.

ठाणे - आरटीआय कार्यकर्त्यांना संशयित आणि ब्लॅकमेलर ठरवत ठाणे महापालिकेने सखोल चौकशी करून संबधीतांवर कठोर कारवाईची मागणी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांकडे केल्याचे पडसाद शहरात उमटू लागले असून यापुढे पालिकेकडे माहिती विचारायची नाही का? असा संतप्त सवाल माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे. महापालिकेच्या कारभारातील विसंगती उघड करीत असल्यानेच ही कारवाई होत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.वारंवार तक्रारी दाखल करणाºयांमध्ये काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा अहवाल पालिकेने पोलीस आयुक्तांना सादर केला आहे. या व्यक्तींचे या अनियमित कृतीबाबत सविस्तर अहवाल संबंधीत विभागाने तयार केला आहे. त्या अनुषंगाने व्यक्ती व कामनिहाय माहिती तयार केली असून ती या पत्राबरोबर पालिकेने पोलिसांना दिली आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात काही व्यक्तींची एक साखळी कार्यरत असल्याचा निर्ष्कषदेखील काढला आहे. त्या अनुषंगाने या सर्वांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या पत्राद्वारे पालिकेने केली आहे.पालिकेने उचललेल्या या पावलामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. आम्ही महापालिकेतील काही चुकीची कामे उघड केली म्हणूनच ही कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.महापालिकेच्या कारभारातील विसंगती दाखविणे हे चुकीचे असेल तर अशा प्रकारचे माहिती अधिकाराचे अर्ज टाकतच राहणार, असेही खडे बोल त्यांनी सुनावले आहेत. संविधानाने आम्हाला हा अधिकार दिलेला आहे. परंतु, पालिका या अधिकाराची अशा पद्धतीने गळचेपी करीत असेल, तर ते चुकीचे आहे. आम्ही या दडपशाहीला बळी पडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.मी २०१४ मध्ये फाईल गहाळ झाल्याने एकच आरटीआय टाकला होता. त्यानंतर आजतागायत मी एकही अर्ज केलेला नाही. परंतु, संविधांनाने दिलेल्या अधिकाराची अशा पद्धतीने गळचेपी होत असेल तर आणखी पत्रव्यवहार केले जातील. वेळ पडल्यास पालिकेच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करू.- रामभाऊ तायडे, माजी नगरसेवक, ठामपामहापालिकेच्या काही विभागात असलेली विसंगती दाखविण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत, आणि अशा प्रकारे जर आमच्याकडून ब्लॅकमेलिंग अथवा इतर कोणता प्रयत्न झाला असेल तर तशी तक्रार करणे योग्य आहे. परंतु, विसंगती दाखविल्यानेच हा सुड उगारण्याचा हा प्रयत्न आहे.- राजेश मोरे, परिवहन समिती सदस्य, ठामपाया संदर्भात पालिके कडून अद्याप लेखी स्वरुपात आम्हाला कोणतीचा माहिती प्राप्त झालेली नाही. त्यामुळे यावर आताच बोलणे योग्य ठरणार नाही. परंतु, वेळ आल्यास वकिलांशी चर्चा करून कायदेशीर उत्तर दिले जाईल.- संजय घाडीगांवकर, माजी नगरसेवकपालिकेकडून याबाबत अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही. परंतु, माहिती अधिकारात माहिती विचारणे चुकीचे आहे का?- सुधीर बर्गे, माहिती अधिकार कार्यकर्ते

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका