शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खासगी आयुष्यात डोकावू नका, सर्वोच्च न्यायालयानंतर लोकांनीही टोचले कान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 02:50 IST

व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर लक्ष ठेवण्याच्या नरेंद्र मोदी सरकारच्या योजनेला सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतला असताना आता या योजनेवर नेटकऱ्यांनीही सडकून टीका केली आहे.

ठाणे : व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर लक्ष ठेवण्याच्या नरेंद्र मोदी सरकारच्या योजनेला सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतला असताना आता या योजनेवर नेटकऱ्यांनीही सडकून टीका केली आहे. व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर पाळत ठेवणे, हा आमच्या प्रायव्हसीचा भंग असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. लोकशाहीमधील व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करणारी भूमिका घेणारे नेते कुणीही असो, त्याचा पक्ष कुठलाही असो, त्याला निवडणुकीत धडा शिकवण्याची भाषा तरुणाई बोलू लागली आहे.मित्रमैत्रिणी, प्रेयसीप्रियकर एकमेकांशी काय बोलतात, ही संपूर्ण आमची खाजगी बाब आहे. यात सरकारने डोकावणे चुकीचे आहे. आम्ही या निर्णयाला विरोध करू, अशा शब्दांत सोशल मीडियावर तरुणांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही नेटकºयांनी आपल्या प्रतिक्रिया ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या आहेत. व्हॉट्सअ‍ॅप एकमेकांशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम आहे. यात कुटुंबसदस्य, मित्रमैत्रिणी, प्रियकरप्रेयसी एकमेकांशी बोलत असतात, गप्पा मारतात, अनेक प्लान्स तयार करत असतात. एकमेकांकडे व्यक्त होत असतात. या सर्व गप्पांमध्ये डोकावण्याचा अधिकार सरकारला दिलाच कुणी?सोशल मीडियाने केंद्रात नरेंद्र मोदी यांना भरभक्कम बहुमत देऊन पंतप्रधान केले. आता त्याच सोशल मीडियावरील टीका सरकारला का झोंबते, असा सवाल तरुणाई करत आहे. जेव्हा आम्ही भाजपाच्या सोशल मीडियाने तयार केलेले संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड करत होतो, तेव्हा यांना गुदगुल्या झाल्या. आता भाजपाच्या महागाई, बेरोजगारी, असहिष्णुता याविरोधातील मेसेज फॉरवर्ड व्हायला लागल्यावर यांच्या पोटात का दुखते, असे सवाल तरुणांनी केले. जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिले आहे. कोण काय फॉरवर्ड करते, यावर लक्ष ठेवायला निवडून दिलेले नाही. आधी फेसबुकवर अशी बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. सरकार सोशल मीडियावर लक्ष ठेवणार, अ‍ॅडमिनला अटक करणार, अशा अफवा पसरवून समाजात भीतीचे वातावरण निर्माण केले, तरी नेटिझन्स सरकारविरोधी बोलण्याचा हक्क बजावणारच, असा टोला तरुणांनी दिला.आम्हा तरुण मंडळींना आमचे पालक प्रायव्हसीबाबत मोकळीक (स्पेस) देतात. मग, आमच्या खासगी आयुष्यात डोकावणारे सरकार कोण आले? सीमेवरील घुसखोरी यांना थांबवता येत नसेल, खोटी ओळखपत्रे बनवून राहणाºया बांग्लादेशी अन् इतरांवर कारवाई करणे शक्य नसेल, चीनमधून येणारी काही घातक रसायने व इतर बेकायदेशीर गोष्टी थांबवता येत नसतील, तर सरकारवर टीका होणारच. ‘व्हॉट्सअ‍ॅपवर लक्ष’ ठेवण्यामुळे ती टीका थांबणार नाही. लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात सरकार डोकावणार असेल, तर आम्ही तरु ण मंडळी ते अ‍ॅप आणि सरकार जरूर बदलू, हे ध्यानात ठेवा.- सर्वेश तरे, कशेळीव्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये एक नंबर पोलिसांचा असेल, असे संदेश सरकारचे हस्तक गेले काही दिवस पसरवत आहेत. असे फेक मेसेज पाठवून आपण या देशातील तरुणांना मूर्ख बनवू, असे त्यांना वाटतेच कसे? पोलिसांकडे लक्षावधी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील कोट्यवधी मेसेजवर नजर ठेवण्याइतके मनुष्यबळ तरी आहे का? वाढत्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्याकरिता सायबर सेलची बांधणी मोठ्या प्रमाणात करायला हवी. व्हॉट्सअ‍ॅपवरील फेक मेसेजचे साम्राज्य संपवायला हवे.- सायली चव्हाण, कल्याणसुप्रीम कोर्टाने नोंदवलेले निरीक्षण योग्यच आहे. अफवा रोखण्यासाठी जनजागृती करता येईल. आयटी अ‍ॅक्ट आणखीन सक्षम करता येईल. व्हॉट्सअ‍ॅपला फेक न्यूज ओळखण्याची आणि प्रसारणासंबंधी कठोर उपाय करायला सांगता येतील. असे अनेक उपाय तज्ज्ञांच्या साहाय्याने करता येतील. लोकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर लक्ष ठेवणे ही यंत्रणेची हतबलता वाटते. आम्ही आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये काय बोलतो, याची माहिती करून घेणे म्हणजे अतीच झाले.- विश्वास उद्गीरकर, बदलापूरआपण म्हणतो की, प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. मग, जर सरकारच आपलं व्हॉट्सअ‍ॅप तपासायला लागले तर ते कितपत योग्य आहे? आपण आपला मोबाइल घरात आईवडिलांनाही देत नाही, मग सरकारने तो का बघावा? मुळात व्हॉट्सअ‍ॅप ही एक खासगी गोष्ट आहे. सरकारने आखलेली नवीन योजना न पटण्यासारखी आहे.- आदित्य नाकती, ठाणेसरकारविरोधी बोलणं याचा अर्थ राष्ट्रद्रोही असणे असा लावण्याचा मठ्ठपणा सरकारने करू नये. आधारकार्ड सगळीकडे लिंक करूुन कोण काय खरेदी करतात, यावर लक्ष ठेवले येथवर ठीक होते. पण, सोशल मीडियाचा संकोच अतीच झाला. - हनिफ तडवी, डोंबिवलीसोशल मीडियामुळे माणसाच्या स्पष्ट विचारांना वाव मिळाला; पण सरकारने आणलेली नवीन नियमावली आमच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे. आमच्यासारख्या तरुणाईच्या मतस्वातंत्र्यावर आणि आमच्या व्यक्तिगत आयुष्यावर सरकार टाळे लावू पाहते आहे.- अस्मिता राजेशिर्के, डोंबिवलीव्हॉट्सअ‍ॅप हा खाजगी अ‍ॅप आहे आणि आपण चर्चेसाठी, संवादासाठी तो वापरतो. पण, जर सरकार व्हॉट्सअ‍ॅपवरील खाजगी बाबींमध्ये डोके घालत असेल, तर आपल्या खाजगी आयुष्यात ती ढवळाढवळ असेल.- शुभांगी गजरे, ठाणे