शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गर्भलिंग चिकित्सेला मौन समर्थन देऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 05:42 IST

२०१२ साली राज्यभर गाजलेल्या अवैध गर्भपात प्रकरणात बीडच्या डॉ. मुंडे दाम्पत्याला न्यायालयाने दोषी धरून, दोघांनाही १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

- स्नेहा पावसकर २०१२ साली राज्यभर गाजलेल्या अवैध गर्भपात प्रकरणात बीडच्या डॉ. मुंडे दाम्पत्याला न्यायालयाने दोषी धरून, दोघांनाही १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणाची समूळ चौकशी करून त्यांच्याविरोधात ठोस पुरावे गोळा केले, ते बीडच्या तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनी, डॉ. राठोड या सध्या आरोग्यसेवा, मुंबई मंडळ येथे उपसंचालकपदी कार्यरत आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत आणि सद्य परिस्थितीबाबत त्यांच्याशी केलेली ही बातचीत.प्रश्न : मुंडे दाम्पत्याचा नेमका पर्दाफाश कसा केला होता?उत्तर : मी १३ जून, २०१० रोजी परळी येथे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून रुजू झाले. त्या वेळी मी तेथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून डॉ. मुंडे दाम्पत्याच्या गैरकृत्याबद्दल ऐकून होते. शिवाय सात-आठ स्त्री अर्भके तेथील नाल्यात सापडल्याची माहिती मिळाली. आम्ही मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये चौकशीला गेलो असता, सुरुवातीला आम्हाला काही जणांनी पळवून लावले. एकदा तर आम्हाला कोंडून ठेवण्याचाही प्रयत्न झाला. वर्षभरानंतर त्या डॉक्टरने एका महिलेचा गर्भपात केला आणि त्यात ती महिला मृत्यू पावली. त्यानंतर, मुंडे दाम्पत्यावर केस दाखल केली. हॉस्पिटलमध्ये गेलो, तर ते दोघेही फरार झाले होते. आम्ही हॉस्पिटलचा तपास केल्यावर आम्हाला एक गुप्त दरवाजा दिसला. आम्ही तो तोडला, तर आतमध्ये सुमारे १०० बेड होते. आम्हाला इतरही काही मशिन, रजिस्टर मिळाले. त्यात काही नोंदी आढळल्या, तेच पुरावे ठरले. आम्ही ते सर्व ताब्यात घेऊन त्याचे योग्य फायलिंग केले. शासन या प्रकरणात आमच्या पाठीशी होते, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातही आम्ही त्यांना जामीन मिळू दिला नाही.प्रश्न : ठाण्यात अशा प्रकारच्या काही घटना आढळल्या का?उत्तर : डॉ. मुंडे दाम्पत्याचा पर्दाफाश केला. या प्रकरणाने संपूर्ण मराठवाडा हादरला. त्यानंतर, साधारण २०१३ साली मी ठाण्यात रुजू झाले. गेली काही वर्षे मी ठाण्यात काम पाहते आहे. मात्र, ठाण्यात अशा प्रकारच्या केसेस मला आढळलेल्या नाहीत. अर्थात, गडचिरोली किंवा बीड या जिल्ह्यांच्या तुलनेत ठाण्याचे लिंगगुणोत्तर (सेक्स रेशिओ) चांगले आहे, तसेच साक्षरतेचे प्रमाणही चांगले असल्यानेलोक अशा घटना काळजीपूर्वक हाताळतात.>गर्भपातप्रकरणी मानसिकता बदलण्याची गरज आहे का?उत्तर : अर्थातच, मुंडेंच्या प्रकरणात आम्हाला लक्षात आले की, इतर डॉक्टरांना माहीत असूनही कोणीही याबाबत काहीच बोलत नव्हते किंवा पूर्वी बोलले नव्हते. आपले सहकारी, शेजारी, जवळपासची व्यक्ती एखादे चुकीचे कृत्य करत असेल, तर त्याबाबत मौन बाळगून आपण एक प्रकारे त्याला समर्थन देतो. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात गैरवर्तन करणाऱ्या आपल्या सहकाऱ्याला पाठीशी घालू नये. गर्भपात करणे हा गुन्हा आहे, याबाबत रुग्णांमध्ये जागृती केली पाहिजे.ठाणे, पालघरमध्ये आरोग्यविषयक कोणता गंभीर प्रश्न आहे?उत्तर : जिल्ह्यातील आरोग्यविषयक परिस्थितीचा आम्ही आढावा घेतो. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत महिलांमध्ये अ‍ॅनिमिया आजार मोठ्या प्रमाणात दिसतो. मुलगा-मुलगी असा भेदभाव नसला, तरी मुली, महिलांच्या शारीरिक पोषणाबाबत जागरूकता दिसत नाही. त्यामुळे बालमृत्यू, तसेच गरोदर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते आहे.ठाण्यात शहापूर, मुरबाडया ग्रामीण भागांत अ‍ॅनिमियाग्रस्त महिलांचे प्रमाण अधिक आहे.