शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
2
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
3
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
4
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
5
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
6
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
7
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
8
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
9
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स
10
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
11
तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करुन घरात ठेवलंय? CA नितीन कौशिक म्हणतात ही गुंतवणूक नाही तर...
12
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 
13
Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?
14
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
15
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
16
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
17
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
18
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
19
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
20
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक

लघु उद्योजकांसाठी खऱ्या अर्थाने दिवाळी आजपासूनच सुरु - सुरेश प्रभु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 19:45 IST

मराठी उद्योजकांसाठी आजपासूनच दिवाळी सुरु झाली असून, त्यांनी मोदींनी केलेल्या घोषणेचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी केले.

ठळक मुद्देमराठी उद्योजकांना संधीमराठी उद्योजकांची अडथळ्यांची शर्यत दूर

ठाणे - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ज्या काही घोषणा केल्या आहेत. त्या लघु उद्योजकांसाठी दिवाळी पूर्वीच पहिली पहाट झालेली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेत मराठी उद्योजकांनी गरुड झेप घ्यावी असे आवाहन केंद्रीय वाणिज्य, उद्योग तथा नागरी उड्डयण मंत्री सुरेश प्रभु यांनी केले.        ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर येथे आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या कार्यक्रमाल ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठी उद्योजकांना आवाहन केले. मराठी उद्योजक झेप घेऊन पुढे येत नाहीत, ते नेहमीच थोडे घाबरलेले असतात. परंतु आता मोदी यांनी केलेल्या घोषणेनंतर मराठी उद्योजकांनी यामध्ये मोठी गरुड झेप घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले. मराठी माणसाची दिवाळी ही पहिली अंघोळ जेव्हा असते, त्यावेळी खºया अर्थाने दिवाळी सुरु झाली असे मानले जाते. परंतु आता मराठी उद्योजकांची दिवाळीची पहिली पहाट ही आजपासूनच झाली असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी केवळ घोषणा केल्या जात होत्या. परंतु अंमलबजावणी होत नसल्याने उद्योजकांचा हिरमोड होत होता. आता मात्र केवळ घोषणाच झाली नसून त्याची अंमलबजावणीसुध्दा आजपासून सुरु झाल्याचेही त्यांनी सांगितले. देशाला अडथळा शर्यतीत कधीही गोल्ड मेडल मिळालेले नाही. परंतु लघु उद्योग क्षेत्रातल्या काम करणाºया मंडळींना रोजच्या रोज अडथळ्यांच्या शर्यतीला सामोरे जावे लागते. परंतु ही अडथळ्यांची शर्यत पार करुन लघु उद्योजक यशस्वी झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. जर हे अडथळेच नसतील तर लघु उद्योजक किती पुढे जातील, ती संधी आता केंद्र सरकाराने उपलब्ध करुन दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उद्योग सुरु करतांना कर्ज मिळत नाही, कर्ज मिळाले तर व्याज परवडत नाही, व्याज परवडले तर बाजारपेठ मिळत नाही, बाजारपेठ मिळाली तर पैसे परत मिळण्यासाठी धडपड सुरु असते. परंतु आता ज्या घोषणा झाल्या आहेत, त्यामुळे या सर्व अडचणी दुर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मला दिल्लीला थांबण्यासाठी सांगितले होते. परंतु मी ठाण्याची निवड केली. ठाण्यात आल्यावर प्रवास पूर्ण होतो असे बोलले जाते. त्यानुसार ठाण्यात आल्यावर आता आमचे देखील उद्दीष्ट खºया अर्थाने पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांच्या समवेत भिवंडीचे खासदार कपील पाटील, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, भाजपाचे शहर अध्यक्ष संदीप लेले, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, बँक आॅफ महाराष्ट्रचे महाप्रबंधक महेश महाबळेश्वरकर आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेSuresh Prabhuसुरेश प्रभूBJPभाजपा