शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धगडावर दिवाळीत दीपोत्सव! परिसर रोषणाईने उजळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 16:27 IST

कर्जतमधील एक दीप शहिदांचा ग्रुप आणि क्रांतिवीर भगत मास्तर प्रतिष्ठान यांच्या वतीने सिद्धगडावर दिवाळीत दीपोत्सव साजरा करण्यात आला.

ठाणे - दरवर्षी प्रमाणे यावर्षीही कर्जतमधील एक दीप शहिदांचा ग्रुप आणि क्रांतिवीर भगत मास्तर प्रतिष्ठान यांच्या वतीने सिद्धगडावरदिवाळीत दीपोत्सव साजरा करण्यात आला. शेकडो पणत्या लावून बुधवारी (7 नोव्हेंबर) रात्री 12 वाजता पणत्या प्रज्वलित करुन वीरभाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

सिद्धगडावर स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांना दोन जानेवारी 1943 रोजी सिद्धगडावर येथे वीरगती प्राप्त झाली. तेथे त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हुतात्मा ज्योत उभारण्यात आली आहे. तिथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी दीपोत्सव साजरा करण्यात आला.

भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर भाई कोतवाल,  हिराजी गोमाजी पाटील तसेच क्रांतिविरांचे स्मरण व्हावे आणि सिद्धगडचा ज्वलंत इतिहास अखंड तेवत राहावा, हा उद्देश समोर ठेऊन मागील वर्षी पोशीर येथील धनेश राणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे, यंदाचे हे तिसरे वर्ष होते.

सिद्धगड या पवित्र वीरभूमी येथे दीपावलीनिमित्त दिवे रोषणाईचा उत्सव हा शहिदांचे स्मरण म्हणून कर्जत तालुक्यातील अवसरे, मानिवली, पोशीर व इतर गावांमधील तरुण साजरा करत असतात. यावर्षी मुरबाड येथील मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सर्वांच्या सहभागाने संपूर्ण परिसर रोषणाईने उजळला होता. यावर्षी तरुणांनी या जागेची साफसफाई देखील चांगल्या पद्धतीने केली होती.

मोठ्या संख्येने तरुण शहीदांचे स्मरण म्हणून एक दिवा तेवण्याकरिता उपस्थित होते. यावेळी मुरबाड पंचायत समितीचे उप सभापती दीपक खाटेघरे, मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत बुष्ठे, सिद्धगड स्मारक समितीचे अध्यक्ष महेंद्र पवार,  क्रांतीवीर भगत मास्तर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भरत भगत, धनेश राणे, महेश शिंगटे, आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी हुतात्म्यांविषयी कृतज्ञात व्यक्त केली.

टॅग्स :DiwaliदिवाळीFortगडthaneठाणे