शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

दिवा डम्पिंग ग्राउंडचा वाद : कचऱ्यावरून सेना विरुद्ध सेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 03:13 IST

ठाणे महापालिकेत शिवसेनेची स्वबळावर सत्ता असून दिव्यातील डम्पिंग ग्राउंडच्या त्रासातून लोकांची सोडवणूक करणे, ही त्यांची जबाबदारी असताना शिवसेनेनेच या मुद्यावर आंदोलन करण्याचा व ३१ डिसेंबरनंतर कच-याची एकही गाडी येऊ न देण्याचा इशारा दिल्याने हसावे की रडावे, अशी ठाणेकरांची अवस्था झाली आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेत शिवसेनेची स्वबळावर सत्ता असून दिव्यातील डम्पिंग ग्राउंडच्या त्रासातून लोकांची सोडवणूक करणे, ही त्यांची जबाबदारी असताना शिवसेनेनेच या मुद्यावर आंदोलन करण्याचा व ३१ डिसेंबरनंतर कच-याची एकही गाडी येऊ न देण्याचा इशारा दिल्याने हसावे की रडावे, अशी ठाणेकरांची अवस्था झाली आहे.दिव्यात डम्पिंग व्हावे, यासाठी सत्ताधारी पक्षातील आमदारानेच प्रशासनाला पत्र दिले होते. आता सत्ताधारी पक्षाचे उपमहापौर रमाकांत मढवी यांनी डम्पिंग बंद करण्यासाठी लक्षवेधी मांडल्याने शिवसेनेच्या भूमिकेत सातत्य नाही. डम्पिंग बंद न झाल्यास होणाºया आंदोलनाची झळ प्रशासनाबरोबरच १३१ नगरसेवकांना सोसावी लागेल, असा राणाभीमदेवी थाटाचा इशारा त्यांनी शुक्रवारी दिला. ३१ डिसेंबरनंतर दिव्यात कचºयाची एकही गाडी फिरकू देणार नसल्याचा इशारा सेनेचेच नगरसेवक शैलेश पाटील यांनी दिला. प्रशासनाने तीन महिन्यांची मुदत वाढवून घेत, सत्ताधाºयांना आश्वासनांचे गाजर दिले.उपमहापौरांच्या लक्षवेधीला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला असला, तरी २५ वर्षांत डम्पिंग बंद करू न शकलेल्या सेनेला राष्ट्रवादी आणि भाजपाने टोले लगावले. मढवी यांच्या लक्षवेधीला नगरसेवक संतोष वडवले यांनी अनुमोदन दिले. पालिकेचा आराखडा तयार होऊन २० वर्षे झाल्यानंतरही कचºयाचा प्रश्न सुटला नाही. प्रशासनाने कचरा विल्हेवाटीसाठी प्रयत्न केले नाही. दिव्यात रहिवासी भागामध्ये ५ ते १० मीटरवर कचरा टाकला जातो. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, डम्पिंग बंद करण्याची तारीख जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.वनखात्याच्या खदाणीसाठी प्रयत्न केले नाही. खाजगी जागेत कचरा टाकला जातो. डम्पिंगसंदर्भात कधीही उठाव होईल. कचºयाची एकही गाडी दिव्यात जाऊ दिली जाणार नाही. मग, हा कचरा ठाणे शहरात गेला तर १३१ नगरसेवकांना याची झळ पोहोचेल, असा इशारा मढवी यांनी यावेळी दिला.दिव्यातील शिवसेनेचे आठही नगरसेवक यावेळी आक्रमक झाले. वास्तविक, दिव्यात खाजगी जागेत डम्पिंग व्हावे, यासाठी त्यांच्या पक्षातील आमदाराने प्रशासनाला पत्र दिले होते आणि आता त्यांच्याच विरोधात सेनेचे नगरसेवक अशी भूमिका घेत असल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. कोट्यवधींचे प्रकल्प आणले जातात, मात्र डम्पिंगसाठी प्रयत्न होत नसल्याचे पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे शानू पठाण यांनी पाठिंबा देत रेतीबंदरपासूनच गाड्या अडवण्याचा इशारा दिला.अपर्णा साळवी यांनी उपमहापौरांना डम्पिंगवर लक्षवेधी मांडावी लागते, ही शोकांतिका असून, या मुद्यावर एकत्र येणे आवश्यक असल्याचे सांगितले. भाजपाचे नगरसेवक संदीप लेले यांनी शिवसेनेवर टीका करत देखाव्यांवर खर्च करण्यापेक्षा डम्पिंगचा प्रश्न सोडवण्याचे आवाहन त्यांनी केले.प्रशासनाने घेतली तीन महिन्यांची मुदतराज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सत्तेत सहभागी असूनही शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका वेळोवेळी वठवते. विरोधी पक्षाचे हे सोंग शिवसेना नेत्यांच्या अंगी इतके भिनले आहे की, ठाणे महानगरपालिकेत आपली स्वबळावर सत्ता असून डम्पिंगचा प्रश्न सोडवणे, ही आपली जबाबदारी आहे, याचाच सेनेला विसर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.मिलिंद पाटील म्हणाले, उपमहापौरांनी लक्षवेधी मांडणे हीच खेदाची बाब आहे. स्वत:चे आमदार, खासदार, पालकमंत्री असतानाही प्रश्न सुटत नाही, तर सत्ता घ्यायचीच कशाला, असा टोला त्यांनी लागवला. दिव्यातील नगरसेवक कधीही गाड्या बंद करू शकतात, मात्र त्यांनी ठाणेकरांचा विचार करून आतापर्यंत आंदोलन केले नसल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले.कचरा निर्मूलनासाठी पालिका प्रशासनाकडून विविध प्रकल्प सुरू असल्याची माहिती उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी दिली. त्यांच्या उत्तरामुळे समाधान न झाल्याने डम्पिंग कधी बंद करणार, याची तारीख जाहीर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली. अखेर येत्या तीन महिन्यांत डम्पिंग बंद करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.नवीन ठाण्यात डम्पिंग करावे : डम्पिंगचा प्रश्न गंभीर असून, वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्याकरिता नवीन ठाण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंड नवीन ठाण्यात करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :dumpingकचराthaneठाणे