शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळण्यासाठी धावणार, जम्मू काश्मीरच्या स्पर्धेसाठी निवड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 00:54 IST

Palghar : ग्रामीण भागातील उधवा येथील विशाल पारधी याने मुंबईमधील ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यामुळे त्याची निवड जम्मू-काश्मीर येथील धावण्याच्या स्पर्धेसाठी झाली आहे.

पालघर : मुंबईमधील धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्यानंतर जम्मू-काश्मीर येथील स्पर्धेसाठी निवड झालेल्या विशाल पारधी या आदिवासी मुलाचा वेग घरच्या गरिबीमुळे रोखण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र शिवसेनेचे संपर्कप्रमुख वैभव संखे यांनी  त्याची आर्थिक गरज पूर्ण केल्याने आपण स्पर्धेत सुसाट धावत जिल्ह्यासाठी प्रथम क्रमांकाचे पदक मिळविणार, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. ग्रामीण भागातील उधवा येथील विशाल पारधी याने मुंबईमधील ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यामुळे त्याची निवड जम्मू-काश्मीर येथील धावण्याच्या स्पर्धेसाठी झाली आहे. मात्र, त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागणारे उच्च दर्जाचे बूट आणि प्रवासाचा, राहण्याचा खर्च त्याला पेलता येणे शक्य नव्हते. त्याच्या ध्येयाला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. आदिवासीबहुल भागातील बांधवांनी जमा केलेली आर्थिक मदत तुटपुंजी असल्याने त्याचे मनोधैर्य खचत चालले होते. यावेळी काही तरुणांनी पालघर विधानसभेचे संपर्कप्रमुख वैभव संखे यांच्या कानी विशालची कैफियत मांडली. त्यांनी तात्काळ आपल्या घरी बोलावून त्याच्या हाती रोख रक्कम सुपूर्द करीत सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले. तुझ्या यापुढील स्पर्धेत शिवसेना नेहमीच तुझ्यासोबत असेल, असा विश्वास संखे यांनी विशालला देत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सोबत कोलवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता चिंतामण संखे,  उपसरपंच  प्रदीप पाटील, सचिन पिंपळे, रणजित कोम उपस्थित होते.

टॅग्स :palgharपालघर