शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईच्या काळात सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी जि.प. सीईओंचा शहापूर ग्रामीण दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 19:15 IST

शहापूर तालुक्यात ४६ गावे आणि १३३ गाव-पाड्यांना ट्रंकरने पाणी पुरवठा सुरु असल्याची पाहाणी या दौऱ्यांप्रसंगी बुधवारी करण्यात आली. यावेळी सोनवणे यांनी सापगाव येथील भातसा नदीवरील पंपिंग स्टेशनला भेट देवून जी.पी.एस यंत्रणेची पाहणी केली.

ठळक मुद्देप्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे शहापूर तालुक्याच्या चार पाणी पुरवठा योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला होताया प्रकरणी संबधितांवर गुन्हे दाखल झाले होते.सौरउर्जेचे कामे अर्धवट सौर उर्जेवर चालणारे हात पंप बंद एवढेच नव्हे तर मुरबाड आणि शहापूर तालुक्यात रखडलेल्या ३२ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्याचा दावा

ठाणे : शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदने टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हिरालाल सोनवणे यांनी शहापूरच्या ग्रामीण, दुर्गम भागाचा दौरा करून अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.शहापूर तालुक्यात ४६ गावे आणि १३३ गाव-पाड्यांना ट्रंकरने पाणी पुरवठा सुरु असल्याची पाहाणी या दौऱ्यांप्रसंगी बुधवारी करण्यात आली. यावेळी सोनवणे यांनी सापगाव येथील भातसा नदीवरील पंपिंग स्टेशनला भेट देवून जी.पी.एस यंत्रणेची पाहणी केली. ट्रॅकरने पाणी पुरवठा सुरु ळीत सुरु राहावा यासाठी शासनाच्या माध्यमातून जी.पी.एस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याचा दावा जिल्हा परिषदेकडून करण्यात येत आहे. पंचायत समिती स्तरावर या जीपीएस यंणेचे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याचे ही सांगितले जात आहे.शहापूर तालुक्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्र म अंतर्गत यावर्षी दहा योजना मंजूर झाल्या आहेत. तसेच भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील रखडलेल्या पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या दावा जिल्हा परिषद करीत आहे. एवढेच नव्हे तर मुरबाड आणि शहापूर तालुक्यात रखडलेल्या ३२ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्याचा दावा ही जिल्हा परिषद करीत आहे. तरी देखील या शहापूर तालुक्यात २९ टॅकरव्दारे गावखेड्यांना पाणी पुरवठा होत असल्याचे वास्तव मात्र जिल्हा परिषदेचा हा दावा फोल ठरवत आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा टॅकरची संख्या देखील वाढलेली आहे. पूर्ण जिल्ह्यात गेल्या वर्षी २५ टॅकर लागले होते. यंदा शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांमध्ये ३६ टॅकरव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे.मुख्यमंत्री पेयजल कार्यक्र मा अंतर्गत सरलांब आणि भातसे या गावांमध्ये या पाणी पुरवठा सुरु केल्याचे सांगितले जात आहे. जलयुक्त शिवार अंतर्गत शहापूर तालुक्यात १९ विहीर खोलीकरणाचे कामे मंजूर असून ते अजून कागदांवरच आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे शहापूर तालुक्याच्या चार पाणी पुरवठा योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला होता. या प्रकरणी संबधितांवर गुन्हे दाखल झाले होते. यापैकी तीन योजनेचे पाणी पुरवठा सुरळीत सुरु केल्याचा दावा ही केला जात आहे. सौर उर्जेवर चालणारे हात पंप बंद पडलेले आहेत. सौरउर्जेचे कामे अर्धवट ठेवल्यामुळे ग्रामस्थाना या हातपंपाचा उपयोग होत नसल्याची गंभीर बाब निदर्शनात आलेली आहे. त्यावर मात्र जिल्हा परिषदेकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद