शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

जिल्हा रुग्णालयाचे स्थलांतर लांबणीवर; मुख्य सचिवांचा दौरा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:21 IST

राज्याचे मुख्य सचिव डी.के. जैन हे गुरुवारी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यावर येणार होते. यावेळी वागळे इस्टेट, कशीश पार्क येथील महापालिकेच्या सुविधा भूखंडावर उभ्या राहिलेल्या इमारती सामान्य रुग्णालयासाठी देण्याचे महापालिकेने जवळपास निश्चित केले होते.

ठाणे : राज्याचे मुख्य सचिव डी.के. जैन हे गुरुवारी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यावर येणार होते. यावेळी वागळे इस्टेट, कशीश पार्क येथील महापालिकेच्या सुविधा भूखंडावर उभ्या राहिलेल्या इमारती सामान्य रुग्णालयासाठी देण्याचे महापालिकेने जवळपास निश्चित केले होते. परंतु, तेथील स्थानिकांनी रहिवासी क्षेत्राचे कारण पुढे करून विरोध केला अन् त्यातच शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने मध्यस्थी करून मुख्य सचिवांचा दौरा रद्द केल्याचे समोर आले आहे. यामुळे रुग्णालयाचे स्थलांतर लांबणीवर पडले असून ते सुपर स्पेशालिटी कधी होणार याकडे रुग्णांचे लक्ष लागले आहे.१९३६ साली दानस्वरूपात मिळालेल्या पाच इमारतींत ठाणे सामान्य रुग्णालय सुरू आहे. सध्या या पाच ब्रिटिशकालीन इमारती शिकस्त झाल्याने त्या पाडण्याबाबत मार्च महिन्यात शासनाने जीआर काढला. त्यामध्ये पर्यायी जागा मिळत नाही, तोपर्यंत रुग्णालय पाडू नये, अशी अट घातली. दरम्यान, रुग्णालय स्थलांतरासाठी पर्यायी जागा म्हणून वागळे इस्टेट येथील कामगार हॉस्पिटलचे नाव पुढे आले. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी त्या रुग्णालयाची पाहणी केली. पण, ते रुग्णालय केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याने त्यावर निर्णय झालेला नाही. त्याचवेळी सामान्य रुग्णालयात ६७ वाढीव बेडसह १४० बेडचे सुपर स्पेशालिटी अशा ५७४ बेडच्या रुग्णालयाला शासनाने हिरवा कंदील देऊन ते सुरू करण्यासाठी इमारतींचे अंदाजपत्रक आणि आराखडे तयार करण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही दिले होते. यावेळी रुग्णालय प्रशासनाने मेंटल हॉस्पिटल येथील दोन इमारती, साकेत या आदी इमारतींची पाहणी केली. मात्र, साकेत येथील इमारत उपलब्ध नसल्याचे कारण देऊन कौसा, कासारवडवली येथील मार्केट आणि वागळे इस्टेट येथील कशीश पार्क येथील सुविधा भूखंडांवरील इमारतीचे पर्याय दिले होते. त्यापैकी कशीश पार्क येथील इमारतीची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी महापालिकेने सहमती दाखवल्यानंतर मुख्य सचिवांचा दौरा निश्चित झाला होता. पण, तो दौराच रद्द झाल्याचे सूत्रांनी सांगितले.उपसंचालकांकडून पाहणी- मुंबई विभागाच्या आरोग्य उपसंचालक गौरी राठोड यांनी मुख्य सचिवांच्या दौºयाच्या पूर्वसंध्येला ठाणे सामान्य रुग्णालयाची पाहणी केली.- गुरुवारी आरोग्य विभागाचे आयुक्त परिमल सिंग यांनीही शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्याशी चर्चा केली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल