शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आठ बोगस डॉक्टरांचा जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 01:44 IST

कळवा पूर्व आणि पश्चिम भागात बेकायदेशीर दवाखाने चालवणा-या बोगस डॉक्टरांबाबत महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिन प्रबंधक दिलीप डांगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ६ फेब्रुवारी २०२० रोजी कारवाई केली.

ठाणे : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन संघटनेकडे कोणत्याही प्रकारची नोंदणी नसताना बेकायदेशीररीत्या क्लिनिक थाटून गोरगरिबांसह सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळ करणाऱ्या कळव्यातील त्या ‘आठ’ बोगस डॉक्टरांचा जामीन अर्ज गुरुवारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी फेटाळला. या प्रकरणात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून रेखा हिवराळे यांनी युक्तिवाद केला.कळवा पूर्व आणि पश्चिम भागात बेकायदेशीर दवाखाने चालवणा-या बोगस डॉक्टरांबाबत महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिन प्रबंधक दिलीप डांगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ६ फेब्रुवारी २०२० रोजी कारवाई केली.या कारवाईत, अलोक सुभाषचंद्र सिंह-भास्करनगर, कळवा, रामजित कंचन गौतम वाघोबानगर, कळवा, गोपाळ बाबू विश्वास, मनीषानगर गेट नं १ कळवा, रामतेज मोहन प्रसाद, आझाद हिंद चाळ, वाघोबानगर, कळवा, सुभाषचंद्र राजाराम यादव, आनंदनगर, कळवा (पूर्व), जयप्रकाश बालजी विश्वकर्मा, कळवा, पौंडपाडा पोलीस चाळ, दीपक बाबू विश्वास, कळवा (प.) रेल्वे स्टेशनजवळ, रमाबाई आंबेडकर हौ.सो. कळवा, सत्यनारायण लालमन बीड, सद्गुरू चाळ, वाघोबानगर कळवा, अशा आठ बोगस डॉक्टरांना अटक केली. त्यांना ७ फेब्रुवारीला ठाणे न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंतर पुन्हा न्यायालयाने त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यताडॉक्टरांनी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला होता. त्यावर गुरु वारी सुनावणी झाली. त्या वेळी विशेष सरकारी वकील हिवराळे यांनी युक्तिवाद केल्यावर न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी युक्तिवाद आणि संभावीत धोके यासह विविध कारणास्तव जामीन अर्ज फेटाळताना त्यांनी त्या आठ जणांकडे अ‍ॅलोपॅथीक आणि आयुर्वेदिक औषधी साठा सापडला, महाराष्ट्र कौन्सिल नोंदणी नाही. डॉक्टरांकडे इन्स्टिट्यूट आॅफ अल्टर्नेटिव्ह मेडिसिन कोलकाता, पश्चिम बंगाल, याचे प्रमाणपत्र आणि नोंदणी असून महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन याची नोंदणी नाही. अशा प्रकरणात जामीन दिल्यानंतर पुन्हा हेच डॉक्टर विविध ठिकाणी पुन्हा क्लिनिक उघडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर साक्ष नोंदवणाºया साक्षीदारांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवत तो जामीन अर्ज फेटाळला.

टॅग्स :Courtन्यायालयthaneठाणे