शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आरटीईच्या १३ हजार जागांसाठी जिल्ह्यातून २०,६६७ ऑनलाइन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 00:00 IST

शिक्षण विभागाची माहिती : आता सोडतीची अपेक्षा

सुरेश लोखंडेठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्यानुसार जिल्ह्यातील समाजामधील एससी, एसटी, वंचित आणि दुर्बल घटक प्रवर्गातील बालकांना पहिली ते केजीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी १२ हजार ९१३ जागा राखीव आहेत. जिल्ह्यातील ६६९ शाळांमधील प्रवेशांपैकी रिक्त ठेवलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी बुधवारी शेवटच्या मुदतीपर्यंत २० हजार ६६७ आॅनलाइन अर्ज जिल्हाभरातून प्राप्त झाले. त्यातून या आठवड्यात लॉटरी सोडतीद्वारे अपेक्षित शाळांमध्ये प्रवेश निश्चित होण्याची अपेक्षा आहे.

१२ हजार ९१३ राखीव जागांवरील शालेय प्रवेशासाठी ६६९ शाळांची निवड केली आहे. यामध्ये पहिलीच्या वर्गात ११ हजार ५७४ बालकांना प्रवेश मिळणार आहे. पूर्वप्राथमिकसाठी एक हजार ३३९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

अंबरनाथ तालुक्यामधून एक हजार ९९५ अर्ज, भिवंडी-१ ला दोन हजार १९७, भिवंडीला ६३८, कल्याणला एक हजार ८८७, कल्याण-डोंबिवलीला दोन हजार २६६, मीरा-भार्इंदरला १६१, मुरबाडला ६२, ठाणे मनपा क्षेत्रात एक हजार ३४३, ठाणे मनपा २ मध्ये तीन हजार १४३ आणि उल्हासनगर शहरातून एक हजार ६३, नवी मुंबई पाच हजार ३००, तर शहापूरमधून ५९२ आॅनलाइन अर्ज प्रवेशासाठी आले आहेत.

एकूण प्रवेशासाठी वंचित घटकातील प्रवर्गास, ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेली बालके, दुर्बल घटक एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले सर्व घटक, विधवा, घटस्फोटित महिलांची बालके, अनाथ बालक, एकाकी पालकांची बालके आदीना आॅनलाइन अर्ज दाखल करता येतो.शिक्षण हक्क कायद्यान्वये ठाणे जिल्ह्यात एकूण १२ हजार ९१३ जागा राखीव आहेत. या जागांच्या प्रवेशासाठी यंदाही लॉटरी सोडतद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत रिक्त जागांपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. यंदा सात हजार ७५४ ऑनलाइन अर्ज जास्त आले आहेत. 

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा