शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कोकणातील गणेशोत्सवासाठी दोन दिवसातच ८५६ वाहनांना पथकर सवलतीच्या पासचे वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 23:23 IST

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) अवघ्या दोन दिवसातच ७३० एसटी बसेससह ८५६ वाहनांना पथकर सवलतीचे पास वितरीत केले. यामध्ये १२६ खासगी वाहनधारकांना पास दिल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिली.

ठळक मुद्देठाणे आरटीओची कामगिरी७३० एसटींचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी व चाकरमान्यांची पथकरातून सुटका व्हावी, यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलतीचे आदेश दिले. त्यानुसार ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) अवघ्या दोन दिवसातच ७३० एसटी बसेससह ८५६ वाहनांना पथकर सवलतीचे पास वितरीत केले. यामध्ये १२६ खासगी वाहनधारकांना पास दिल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिली.कोकणातील भाविक गणेशोत्सवासाठी पनवेल, पेण, महाड रस्ता, सातारा, भुर्इंज,शेंद्रे तसेच कराड-पाटण चिपळूणमार्गे कोकणात जाणारा महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, वाकण-पाली-खोपोली मार्ग, सिंधुदुर्गातील वागदे-कुडाळ मार्ग, आंबेनळी घाट, रत्नागिरी-सावर्डे या मार्गे कोकणात जातात. त्यामुळेच या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरात सवलत देण्याची घोषणा करीत, त्यांना तातडीने स्टीकर्स उपलब्ध करु न देण्याचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. याच पार्श्वभूमीवर ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील आणि विश्वंभर शिंदे यांनी ठाण्यातील मर्फी येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयातून या पासच्या वितरणाचे नियोजन केले. त्यानुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान खिडकी क्रमांक १६ आणि १८ वर आॅफलाईन पद्धतीने हे पास वितरीत केले जात आहेत. यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करून टोल फ्री पास घेऊन जाण्याचे आवाहन ठाणे आरटीओ कार्यालयाने केले आहे. पास वाटपाच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी परिवहन विभागाच्या कार्यालयातून १६० पासचे वितरण करण्यात आले. यामध्ये १३० एसटी बसेसचा समावेश होता. तर ३० पासेस खासगी वाहनधारकांना दिले. दरम्यान, बुधवारी ६०० पासेस एसटी विभागाला मिळाले. खासगी वाहन धारकांना ९६ पासचे वितरण झाले. आतापर्यंत ठाणे आरटीओ कार्यालयाने ८५६ पासेसचे वितरण केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘‘पहिल्या दिवशी १६० पासचे तर दुसºया दिवशी ६९६ अशा ८५६ पासचे ठाण्यात आतापर्यंत वितरण करण्यात आले. यात ७३० एसटी बसेसचा समावेश आहे. नागरिकांसाठी हे पास सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान आॅफलाईन पध्दतीने वितरीत केले जाणार आहेत. ’’जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे.

टॅग्स :thaneठाणेRto officeआरटीओ ऑफीस