जि. प.च्या शिक्षक संख्येचे गणित बिघडले; १,७७२ रिक्त पदांमध्ये १,२५० अतिरिक्त शिक्षक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:41 AM2021-07-28T04:41:37+5:302021-07-28T04:41:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील गावपाड्यांमधील ७७ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विद्यादानाचे पवित्र कार्य ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण ...

Dist. The arithmetic of the number of teachers in W. failed; 1,250 additional teachers in 1,772 vacancies! | जि. प.च्या शिक्षक संख्येचे गणित बिघडले; १,७७२ रिक्त पदांमध्ये १,२५० अतिरिक्त शिक्षक!

जि. प.च्या शिक्षक संख्येचे गणित बिघडले; १,७७२ रिक्त पदांमध्ये १,२५० अतिरिक्त शिक्षक!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील गावपाड्यांमधील ७७ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विद्यादानाचे पवित्र कार्य ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून होत आहे. पण सध्या या शाळांमधील शिक्षक संख्येचे गणित बिघडले आहे. मेअखेरपर्यंत जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षकांच्या एकूण १ हजार ७७२ जागा रिक्त असल्याचे उघड झाले. या जागांवर एक हजार २९० शिक्षक कार्यरत असून, केवळ ४७६ जागा रिक्त असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे म्हणणे आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला वर्षभरापासून पूर्णवेळ शिक्षणाधिकारी नाही. ती कमतरताही महिला व बालकल्याणचे कार्यक्रम अधिकारी भरून काढत आहेत. जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींच्या गावखेड्यांत एक हजार ३२८ प्राथमिक शाळा आहेत. यातील ७७ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना तीन हजार ५७४ शिक्षक, शिक्षिका शिकवत आहेत. जिल्ह्याचा ग्रामीण आणि आदिवासी- दुर्गम भाग म्हणजे पेसा या दोन क्षेत्रात शिक्षक कार्यरत आहेत. यामध्ये मेअखेर तीन हजार ५११ शिक्षक कार्यरत असून, एक हजार ७७२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

रिक्त पदांचा भार एक हजार २९० अतिरिक्त शिक्षकांकडून पूर्ण करून घेतला जात आहे. यामुळे केवळ एकूण ४७६ शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगितले जात आहे. या कालावधीत जानेवारी ते मेपर्यंत ५३ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या. यात पेसा क्षेत्रातील ४८ शिक्षक असून, नाॅन‌पेसा म्हणजे ग्रामीण भागातील पाच शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. याशिवाय या कालावधीत २७ शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. यापैकी सात पेसा क्षेत्रातील व २० नॉनपेसा शाळेचे आहेत. यात कार्यमुक्त केलेल्या ८० शिक्षकांचा समावेश आहे. यात सर्वाधिक ५५ शिक्षक पेसा शाळांमधील आहेत.

-----------

जोड आहे

Web Title: Dist. The arithmetic of the number of teachers in W. failed; 1,250 additional teachers in 1,772 vacancies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.