शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:11 IST

रूपेश यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर भाईंदर पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास जयेश माजलकर, महेश शेट्टी, राहुल शर्मा सह अन्य ४- ५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी राहुल शर्मा याला अटक केली असून बाकीचे आरोपी मात्र पसार झाले आहेत. 

मीरारोड - रेल्वेची कामे करणाऱ्या ३ मराठी भावंडांवर प्राणघातक करण्यात आल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल केला असून एका हल्लेखोरस अटक केली आहे.

भाईंदरच्या राई गावात राहणारे रूपेश पाटील, भूषण पाटील, नितेश पाटील हे आगरी समाजातील तिघे भाऊ मिळून रेल्वे व अन्य सरकारी कामे कंत्राटने घेतात. मंगळवारी सायंकाळी हे तिघे भाऊ, रूपेश यांचा मुलगा यश व सहकारी संकेत म्हात्रे हे भाईंदर पश्चिम धक्काजवळ रेल्वे अधिकारी यांना भेटण्यास गेले होते. त्यावेळी तेथे रेल्वेचे कंत्राट घेणारा जयेश माजलकर सह महेश शेट्टी, राहुल शर्मा व त्यांचे अन्य ४- ५ साथीदार काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आले.  माझ्या कंपनीला रेल्वेने बॉयकॉट केले असे लोकांना का खोटे का बोलत आहे? असं रूपेश यांनी जयेशला विचारणा केली. त्याचा राग येऊन जयेश, शेट्टी, शर्मा आणी अन्य साथीदार हे त्या सर्वांच्या अंगावर धावून धक्कबुक्की व मारहाण सुरु केली.

रूपेश यांना हृदयविकाराचा आजार असल्याने त्यांना वाचवण्यासाठी भूषण व नितेशमध्ये आले असता जयेश याने गाडीतील लोखंडी रॉड काढून भूषणच्या पायावर व डोक्यावर मारुन जखमी केले. महेश शेट्टी, शर्मा व अन्य साथीदार यांनी गाडीतून लोखंडी रॉड, लाकडी दांडे, चॉपर काढून रूपेश, भूषण, नितेश यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. नितेशच्या डोक्यावर रॉड  मारला. जयेश व साथीदारांनी, आमच्या नादी लागल्यास घरी येवून जीव घेऊ अशी धमकी दिली. रक्तबंबाळ झालेले तिघे भाऊ हे जीव वाचवून गाडीतून निघून जात असताना गाडीवर हाताने व काठीने फटके मारले. त्यांनी पोलिसांना मदतीसाठी कॉल केला, मात्र जीवाच्या भीतीने तेथे न थांबता निघून गेले.  पोलिस त्यांना बॉम्बे मार्केट नाक्याजवळ भेटले. भूषण व नितेश यांच्या चेहरा, डोक्याला जखमा होऊन रक्त वाहत होते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. रूपेश यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर भाईंदर पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास जयेश माजलकर, महेश शेट्टी, राहुल शर्मा सह अन्य ४- ५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी राहुल शर्मा याला अटक केली असून बाकीचे आरोपी मात्र पसार झाले आहेत. 

प्राणघातक हल्ला करून खंडणीचा बनाव 

पाटील बंधूंवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर ते जखमी अवस्थेत जीव वाचवण्यासाठी पळून जात असताना हल्लेखोरांनी व्हिडिओ काढून सांगा किती खंडणी पाहिजे? अशी विचारणा करत व्हिडिओ बनवला. नंतर राहुल शर्मा हा पोलिस ठाण्यात जाऊन पाटील बंधूंवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 

टॅग्स :railwayरेल्वेmarathiमराठी