शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी ‘टो’ केल्याने वाद, ठाण्यात वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 17:48 IST

नो पार्किंगमध्ये लावलेली मोटारसायकल उचलल्याने ठाण्यातील तीन हात नाका येथे बुधवारी चांगलाच वाद झाला. एका रहिवाशाने वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालून धक्काबुक्कीही केल्याने पोलिसांनी त्याच्याविरूद्ध कारवाई केली.

ठळक मुद्देतीन हात नाका येथील घटनावाहतूक पोलिसाच्या सहकार्‍याचा मोबाईल फोडलानौपाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा

ठाणे : नो पार्कींगमध्ये उभी केलेली मोटारसायकल उचलल्याने वाद होऊन ठाण्यातील एका रहिवाशाने वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केली. तीन हात नाक्याजवळ बुधवारी दुपारी ही घटना घडली.तीन हात नाका भागात बुधवारी दुपारी नो पार्किंगमध्ये लावलेल्या मोटारसायकल्स उचलण्याचे काम सुरू होते. त्यावेळी आयडिया गॅलरीसमोर उभी केलेली एक मोटारसायकल टोर्इंग व्हॅनवरील कर्मचार्‍यानी उचलली. ठाण्यातील दौलत नगरातील कमलेश श्यामसुंदर लालवानी यांची ही मोटारसायकल होती. मोटारसायकल उचलल्याने त्यांनी टोर्इंग व्हॅनवरील कर्मचार्‍याशी वाद घालण्यास सुरूवात केली. टोर्इंग व्हॅनवर वाहतूक शिपाई अरूण शिंदे हे कार्यरत होते. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, लालवानी यांनी त्यांच्याशीही वाद घालण्यास सुरूवात केली. लालवानी यांनी शिंदे यांना धक्काबुक्की केल्याने वाद चिघळला. टोर्इंग व्हॅनवरील एका खासगी कर्मचार्‍याने या प्रकाराचे त्याच्या मोबाईल फोनमध्ये चित्रिकरण करण्यास सुरूवात केली. त्यामुळे आणखी चिडलेल्या लालवानी यांनी त्याचा मोबाईल फोन आपटून त्याचे नुकसान केले. नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी लालवानी विरूद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला.ठाण्यात वाहनतळांचा अभाव असून, वाहनांच्या तुलनेत पार्किंगसाठी पुरेसी जागा नाही. त्यामुळे टोर्इंग व्हॅनवरील वाहतूक पोलिसांशी वाद होण्याच्या घटना ठाण्यात वाढत आहेत. नो पार्कींगमधील वाहने उचलण्यापूर्वी उद्घोषणा करण्याचा नियम आहे. या नियमांचे पालन कुठेच होत नाही. याशिवाय वाहनधारक मोटारसायकल उभी करून जवळपासच गेला असेल आणि वाहन उचलल्यानंतर त्याने लगेच येऊन वाहन परत मागितले असेल, तर परत देणे अपेक्षित असते. मात्र वाहन उचलताना वाहनधारकाने येऊन विनंती केली तरी त्याला वाहन परत केले जात नाही. वाहनधारकांशी वेळोवेळी वाद होण्याचे हेदेखील एक महत्वाचे कारण आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस