शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

शिल्पकार भाऊ साठे पद्म पुरस्कारापासून वंचित, मुख्यमंत्री, लोकसभाध्यक्ष यांच्याकडे शब्द टाकूनही पदरी निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 07:16 IST

जागतिक कीर्तीचे शिल्पकार भाऊ साठे यांना भारत सरकारकडून पद्म पुरस्कार मिळावा, याकरिता कल्याण सार्वजनिक वाचनालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याशी पत्रव्यवहार करून व सातत्याने पाठपुरावा करूनही यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये साठे यांचा समावेश

- जान्हवी मोर्येकल्याण : जागतिक कीर्तीचे शिल्पकार भाऊ साठे यांना भारत सरकारकडून पद्म पुरस्कार मिळावा, याकरिता कल्याण सार्वजनिक वाचनालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याशी पत्रव्यवहार करून व सातत्याने पाठपुरावा करूनही यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये साठे यांचा समावेश न झाल्याने कल्याणमधील कलाकार व रसिक नाराज झाले आहेत.साठे यांचे वय ९१ वर्षे असून सरकारकडून शिल्पकलेतील त्यांच्या योगदानाची दखल घेतली जाणार की नाही, असा सवाल शिल्पकलाप्रेमींसह कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाने केला आहे. त्यांचा सवाल खरोखरच रास्त आहे. यंदाच्या वर्षी पद्म पुरस्काराच्या यादीत साठे यांचे नाव का समाविष्ट झाले नाही. किमान पुढील वर्षी २६ जानेवारीला भाऊंना पद्म पुरस्कार घोषित होणार का, असा सवाल केला जात आहे.कल्याणमध्ये राहणाºया शिल्पकार साठे यांनी दिल्लीत १९५४ साली गांधीजींचे शिल्प उभारले. त्यानंतर, २०१४ मध्ये गुजरात दांडी येथे गांधींचे शिल्प उभारले. साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, पंडित जवाहरलाल नेहरू, राणी एलिझाबेथ, लॉर्ड माउंटबॅटन, नेताजी सुभाषचंद्र बोस, अटलबिहारी वाजपेयी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची शिल्पे उभारली आहेत. शिल्प तयार करण्याबाबत त्यांनी ‘आकार’ हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक शिल्पकलेच्या अभ्यासकांना मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांत उपलब्ध आहे. त्यांनी डोंबिवली औद्योगिक निवासी भागात एक शिल्पालय उभारले आहे. त्यात त्यांची शिल्पे ठेवली आहेत. शिल्पकलेत करिअर करू इच्छिणाºया भावी शिल्पकारांना मार्गदर्शक ठरू शकतात. साठे हे कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाचे सभासद आहेत. त्यांचे पणजोबा रावबहादूर साठे यांनी कल्याण सार्वजनिक वाचनालय १८६४ मध्ये सुरू केले. साठे हे कल्याण गायन समाजाचे काही काळ अध्यक्ष होते. या कलासक्त शिल्पकाराचा भारत सरकारने सन्मान करणे अपेक्षित आहे. वाचनालयाच्यावतीने साठे यांना पद्म पुरस्कार मिळण्याकरिता १३ सप्टेंबर २०१७ रोजी सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधित सचिवाकडे याबाबतचे सर्व पुरावे देऊन चर्चा केली होती. दीड महिन्यापूर्वी लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन एका शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त कल्याणच्या शाळेत आल्या असताना त्यांच्याकडेही साठे यांना पद्म पुरस्कार मिळण्याकरिता शब्द टाकण्याची विनंती कल्याणमधील कलावंत, रसिक यांनी केली होती. कल्याण-डोंबिवली महापालिकेनेही पद्म पुरस्कारासाठी सरकारदरबारी शिफारस करण्याचे मान्य केले होते. या सगळ्या पाठपुराव्यानंतरही साठे यांचे नाव पद्म पुरस्काराच्या यादीत समाविष्ट झाले नाही. स्वत: साठे यांचा रा.स्व. संघ परिवाराशी निकटचा संंबंध आहे. त्यामुळे आता किमान पुढील वर्षी तरी त्यांच्या नावाचा विचार होणार का, असा प्रश्न आहे.सत्ताबदल होऊनही काहीही साध्य नाहीकाही वर्षांपूर्वी उल्हासनगरच्या चांदीबाई कॉलेजमध्ये ज्येष्ठ गायिका परवीन सुलताना आल्या होत्या. त्यावेळी पद्म पुरस्कार कसे व कोणाला दिले जातात. त्यासाठी कोणताही निकष वापरला जात नाही. त्यामुळे देशातील खरे पद्म पुरस्काराचे मानकरी हे कसे पुरस्कारापासून वंचित राहतात, अशी टीका सुलताना यांनी केली होती.सुलताना यांचा रोख हा तत्कालीन केंद्र सरकारवर होता. मात्र, आता स्वच्छ व पारदर्शकतेचा आग्रह धरणारे सरकार सत्तेवर आल्यावरही पद्म पुरस्काराबाबत शंकेला वाव असेल, तर सत्ताबदल होऊनही काही साध्य झाले नाही, असेच म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया काही कलाकारांनी केली.

टॅग्स :thaneठाणे