शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

बीएसयूपीवर सभेत चर्चा, नगरसेविका मीरादेवी यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 04:00 IST

००९ पासून राबवण्यात येत असलेली बीएसयूपी योजना नवीन पंतप्रधान घरकुल योजनेत समाविष्ट करण्याचा ठराव २६ जुलैच्या महासभेत मंजूर होऊनही अद्याप कार्यवाही सुरू झालेली नाही.

भार्इंदर - २००९ पासून राबवण्यात येत असलेली बीएसयूपी योजना नवीन पंतप्रधान घरकुल योजनेत समाविष्ट करण्याचा ठराव २६ जुलैच्या महासभेत मंजूर होऊनही अद्याप कार्यवाही सुरू झालेली नाही. गेल्या चार वर्षांपासून लाभार्थ्यांचे भाडे पालिकेकडून थकवण्यात आले आहे. हे भाडे लाभार्थ्यांना त्वरित द्यावे तसेच योजना लवकर पूर्ण करण्याची मागणी भाजपा नगरसेविका मीरादेवी यादव यांनी शनिवारी विशेष महासभेत केली.२००९ मध्ये काशिमीरा येथील जनतानगर व काशीचर्च परिसरात बीएसयूपी योजना राबवण्यास मान्यता मिळाल्यानंतर त्यात चार हजार १३६ लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला. सुरुवातीला आठ मजल्यांच्या एकूण २३ इमारती प्रस्तावित केल्यानंतर आतापर्यंत केवळ एका आठ मजली इमारतीचे काम पूर्ण होऊन त्यात १७९ लाभार्थ्यांना सामावून घेण्यात आले आहे. सुमारे २६०० लोकांचेच स्थलांतर अद्याप झाले असून १५०० लाभार्थ्यांनी अद्याप आपली जागा रिकामी केलेली नाही. त्यातील सुमारे एक हजार लाभार्थ्यांना भाड्यापोटी दरमहा तीन हजार रुपये पालिकेकडून दिले जातात. उर्वरित लाभार्थ्यांना पालिकेच्या संक्रमण शिबिरासह एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पात स्थलांतरित करण्यात आले आहे. या रेंगाळलेल्या योजनेतील २१४ लाभार्थ्यांनाच प्रशासनाकडून भाडे देण्यात आले असून उर्वरित लाभार्थ्यांना २०१४ पासून भाडे दिलेले नाही. त्यामुळे लोकांना उत्तरे देताना आमची पंचाईत होते, त्यांना त्वरित भाडे दिले जावे, अशी मागणी मीरादेवी यांनी केली. त्यावर आयुक्तांनी २५० लाभार्थ्यांना भाडे दिल्याचा दावा केला. उर्वरित लाभार्थ्यांना भाडे देण्यासाठी एक कोटी तीन लाखांच्या निधीला नुकतीच मंजुरी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यानच्या काळात योजनेचा खर्च वाढल्याने एकूण जागेपैकी २५ टक्के जागा व्यावसायिक वापरासाठी विकसित करून योजनेचा खर्च भरून काढण्याचा निर्णय पालिकेने दोन वर्षांपूर्वी घेतला. सध्या एक आठ मजली व सहा १६ मजली इमारतींचे काम सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. वाढीव खर्चामुळे योजना रेंगाळल्याने ही योजना पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करण्याचा ठराव २६ जुलैच्या महासभेत मंजूर करण्यात आला. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून ८० टक्के अनुदान व २.५ ऐवजी चार चटईक्षेत्र निर्देशांक मिळणार असल्याने योजना दोन वर्षांत पूर्ण करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. हे आश्वासन प्रशासनाकडून सतत दिले जात असून ते कधीच पूर्ण केले जात नसल्याने गेल्या नऊ वर्षांपासून रेंगाळलेली ही योजना लवकर पूर्ण करावी, अशी मागणी मीरादेवी यादव यांनी केली.प्रशासन लोकांसह लोकप्रतिनिधींना फसवतेआयुक्तांनी योजनेच्या पूर्णत्वासाठी पालिकेने सुमारे १५० कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव येत्या डिसेंबरमध्ये एमएमआरडीएकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. २६ जुलैच्या महासभेत मंजूर झालेल्या ठरावानंतरही प्रशासनाला कार्यवाहीसाठी तब्बल पाच महिन्यांचा कालावधी लागतो, यावर आश्चर्य व्यक्त करून प्रशासन लोकांसह लोकप्रतिनिधींना फसवत असल्याचा आरोप मीरादेवी यांनी केला.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर