शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर आगरीकार्डचीच चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 04:00 IST

राष्ट्रवादीचा मात्र इन्कार : शिवसेनेकडून विकासकामांना प्राधान्य

प्रशांत माने

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेतर्फे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बाबाजी पाटील यांची उमेदवारी घोषित होताच सोशल मीडियावर त्यांच्या समर्थनार्थ चारोळ्या फिरू लागल्या आहेत. पाटील यांच्या समर्थकांनी भूमिपुत्राचा मुद्दा पेटवला आहे. तर, शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून पाच वर्षांत केलेल्या विकासकामांना सोशल मीडियावर प्राधान्य दिले जात आहे.

सोशल मीडियाच्या प्रभावी वापराचे महत्त्व २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर स्पष्ट झाले. भाजपाला केंद्रात सत्ता मिळवताना याचा खूप फायदा झाला होता. यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत या माध्यमाचा सर्वच राजकीय पक्षांनी वापर करण्यास सुरुवात केली. राजकीय पक्षांच्या वॉर रूममधून सोशल मीडियाचे काम चालते. तेथे उमेदवाराचे आॅडिओ, व्हिडीओ संभाषण तयार केले जाते.उमेदवाराची सकारात्मक, तर प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नकारात्मक प्रतिमेची क्लिप, संदेश तयार करून ते व्हायरल केले जातात. मात्र, सध्या तरी याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.कल्याण मतदारसंघात सोशल मीडियावर प्रचार यंत्रणा हाताळण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांची स्वतंत्र टीम तयार केली आहे. शॉर्ट फिल्म, यू-ट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅप आदी माध्यमांद्वारे प्रचार केला जाणार आहे. एखाद्याने मत व्यक्त केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया ट्रोल करून भंडावून सोडले जाते आहे. त्यापद्धतीनेदेखील मांडणीकेली गेल्याने लवकरच सेना-राष्ट्रवादीत ट्रोलयुद्ध पाहावयास मिळणार आहे.सध्या राष्ट्रवादीचे उमेदवार पाटील यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर ‘आगरी समाजाचे नेते’, ‘भूमिपुत्र’ अशा पोस्ट टाकल्या जात आहेत. मात्र, पुरोगामी विचारसरणी असलेल्या पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ सुरू असलेला जातीचा प्रचार चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादीने मात्र अशा प्रचाराचा इन्कार केला आहे.जातीनिहाय मते मागणे, हा आमच्या पक्षाचा ट्रेण्ड नाही. आम्ही पुरोगामी विचारसरणीचेच आहोत. आमच्या सोशल मीडियावरील प्रचाराला खऱ्या अर्थाने ८ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच सुरुवात होणार आहे.27गावे,बेरोजगारीविरुद्ध संसदीयकारकिर्दीचा आढावाबेरोजगारी, २७ गावांचा मुद्दा आणि पक्षाची ध्येयधोरणे, हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया सेलच्या सूत्रांनी दिली. तर, शिवसेनेकडून खासदार शिंदे यांनी पाच वर्षांत केलेली विकासकामे, याला प्राधान्य देण्याबरोबरच त्यांच्या संसदीय कारकिर्दीचा आढावाही सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाShrikant Shindeश्रीकांत शिंदेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक