शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आरटीओ अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे!

By जितेंद्र कालेकर | Updated: July 7, 2024 19:01 IST

ठाणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत.

ठाणे : एखादी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास डगमगून न जाता धैर्याने सामोरे कसे जायचे? संकटग्रस्तांना मदतीचा हात कसा द्यायचा? त्यादृष्टीने ठाण्यातील प्रादेशिक परिवहन विभागाच्या लुईसवाडी येथील कार्यालयात ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या पथकांनी आरटीओच्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले. 

यावेळी आपत्कालीन परिस्थितीमध्ये घ्यावयाच्या खबरदारीबाबतचे प्रशिक्षणही देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. अशावेळी आपत्तीग्र्रस्तांना मदत पोहचविण्यात अडचणी येतात. काही कारणांमुळे उशिरही होतो. 

अशावेळी जिवित आणि वित्तहानी मोठया प्रमाणात होण्याची भीती असते. त्यासोबतच वाढते रस्ते अपघात, हृदय विकार या घटना पाहता, लुईसवाडीतील प्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी आणि अधिकाºयांनीही आपले सामाजिक कर्तव्य बजावण्याच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.

महापूर, पाऊस वादळ वारा, भूस्खलन आदी आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वत:ची तसेच कुटुंबीयांची त्याचबरोबर इतरांची जिवितांची हानी होऊ नये, यासाठी कशाप्रकारे घरगुती उपाययोजना करता, येऊ शकतात, याची सविस्तर माहिती देण्यात आली. विविध रस्ते अपघातात प्रामुख्याने रक्तस्त्राव होऊन अपघाती मृत्य होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अपघातीत जखमींना तत्काळ प्रथमोपचार देऊन रक्तस्त्राव थांबवता येऊ शकतो. याबाबत तसेच हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीला सीपीआर योग्य पद्धतीने कसा देण्यात यावा याबाबतही टी.डी.आर.एफ. जवानांनी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षण कार्यक्रमास ठाणे महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, एन डी आर एफचे निरीक्षक सुशांत कुमार आदींनी मार्गदर्शन केलं.

प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या जवानांनी आरटीओ कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले. त्याचबरोबर प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली.- रोहन काटकर, उपप्रादेशिक परिवहरन अधिकारी, ठाणे. 

टॅग्स :thaneठाणे