शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळांवर आली सक्रांत विद्यार्थ्यांची गैरसोय; सुविधांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 23:09 IST

जाणीवपूर्वक होत आहे दुर्लक्ष

संजय भालेराव आसनगाव : सरकारने कोट्यवधी खर्च करत आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा विकास होण्यासाठी आश्रमशाळा सुरू केल्या आहेत. मात्र सुविधांअभावी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूरच्या अनेक आदिवादी आश्रमशाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत प्रकल्प अधिकारी उदासीन असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे उघड झाले आहे.

शहापूर तालुक्यातील आंबिवली माध्यमिक आश्रमशाळा येथे सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होत आहे. या आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जात असून २१८ मुले, १६० मुली असे एकूण ३७८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेतील विद्यार्थिनी भाड्याच्या घरात दाटीवाटीने राहतात. तेथे स्नानगृह व स्वच्छतागृह यांची संख्या फार कमी असल्याने मुलींची मोठी गैरसोय होते. आश्रमशाळा व मुलींसाठी भाड्याने घेतलेले घर यामध्ये अर्ध्या किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असल्याने मुलींसाठी हे धोक्याचे असून १३५ मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थिंनी शाळा सोडून जात आहेत. या कारणास्तव विद्यार्थी संख्या कमी होत आहे. नव्याने बांधलेल्या आश्रमशाळेत मुलींच्या वसतिगृहाचे काम सुरू आहे. परंतु त्यासाठी असलेली सर्व रक्कम काढल्याचे बोलले जात आहे. आश्रमशाळेत अपुरी स्वच्छतागृहे असल्याने अनेक विद्यार्थी उघड्यावरच प्रातर्विधीस जातात. विद्यार्थी आंघोळीसाठी नदीवर जातात.विद्यार्थीच करतात स्वच्छतासध्या शाळेत तीन स्वच्छतागृहांची तात्पुरती व्यवस्था केली आहे. मात्र मुलांसाठी एकही स्नानगृह नाही. तर भाड्याने घेतलेल्या मुलींच्या विश्रामगृहात दोन स्वच्छतागृहे, तीन स्नानगृहे आहेत. या स्वच्छतागृह व स्नानगृहाचे दरवाजे तुटलेले आहेत.तसेच या आश्रमशाळेत शिपाई, कर्मचारी असूनही कार्यालयाची स्वच्छता विद्यार्थ्यांकडूनच करून घेतली जाते. तर मुलींच्या आरोग्य तपासणीच्या दिवशी अधीक्षक व अधीक्षिका उपस्थित राहत नसल्याची तक्र ार मुलींच्या पालकांनी केली आहे. त्यामुळे ३७८ विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय सोय होत आहे. या गंभीर बाबींवर प्रशासनाने लक्ष केंद्रित करून येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना सुविधा पुरवाव्यात व १३५ निवासी आदिवासी मुलींचा सुरक्षेचा प्रश्न लवकर सोडवावा अशी मागणी पालकांनी केली आहे.