शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडासंकुलात घाणीचे साम्राज्य, केडीएमसीचे दुर्लक्ष, मनसेचे अनोखे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 17:17 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेचे डोंबिवलीतील ह.भ.प सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलात साचलेल्या कच-याकडे आणि घाणीच्या साम्राज्याकडे लक्ष वेधूनही त्याकडे होत असलेल्या दुर्लक्ष होत असल्याचा निषेध म्हणून सोमवारी केडीएमसीच्या विभागीय कार्यालयात मनविसेच्या वतीने मैदानी खेळ खेळून अनोखे आंदोलन छेडण्यात आले.

डोंबिवली:  कल्याण डोंबिवली महापालिकेचे डोंबिवलीतील ह.भ.प सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलात साचलेल्या कच-याकडे आणि घाणीच्या साम्राज्याकडे लक्ष वेधूनही त्याकडे होत असलेल्या दुर्लक्ष होत असल्याचा निषेध म्हणून सोमवारी केडीएमसीच्या विभागीय कार्यालयात मनविसेच्या वतीने मैदानी खेळ खेळून अनोखे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी फ प्रभाग अधिकारी तथा मालमत्ता विभागाची अतिरिक्त जबाबदारी असलेल्या अमित पंडीत यांना निवेदन देण्यात आले. दुरवस्थेची दखल न घेतल्यास मनसे आपल्या पध्दतीने आंदोलन छेडेल आणि लग्न समारंभाला ऐनवेळी दिलेल्या तारखा रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर येईल असा इशारा मनविसेचे डोंबिवली शहरअध्यक्ष सागर जेधे यांच्यावतीने देण्यात आला. क्रिडासंकुलात पार पडणा-या लग्न समारंभामुळे सद्यस्थितीला कच-याचे साम्राज्य पसरले आहे. काही दिवसांपुर्वीच याकडे लक्ष वेधत मनविसेचे जेधे यांनी 24 तासात क्रीडासंकुलातील कचरा न उचलल्यास महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्त पी वेलरासू यांना हाच कचरा पाठवून देऊ असा इशारा दिला होता. क्रिडासंकुल हे डोंबिवलीकरांसाठी एकमेव मोठे मैदान आहे. या ठिकाणी सकाळ व सायंकाळच्या सुमारास ज्येष्ठ नागरीक चालण्या-फिरण्यासाठी येत असतात. परंतू हे मैदान उत्सव आणि लग्न सोहळयांसाठी भाडयावर दिले जात असल्याने खेळाडुंच्या खेळास आणि नागरीकांच्या फिरण्याला बंधन येत आहेत. दरम्यान गेल्या सोमवारी याठिकाणी पार पडलेल्या लग्न सोहळयामुळे कचरा जमा झाला होता. तो उचलला न गेल्याने दरुगधीचे वातावरण पसरले होते. त्याप्रकरणी इशारा देऊनही पुन्हा एकदा शनिवारी झालेल्या अन्य एका सोहळयामुळे कचरा जमा होऊन जैसे थे पडल्याचे जेधे यांच्या निदर्शनास पडले. याकडे वारंवार लक्ष वेधूनही हा प्रकार सुरू असल्याने जेधे यांनी कार्यकत्र्यासह सोमवारी केडीएमसीचे विभागीय कार्यालय गाठून अनोखे आंदोलन छेडले. 20 तारखेला निवेदनाद्वारे महापालिकेचे उपायुक्त सुरेश पवार यांचे लक्ष वेधण्यात आले होते. पण याउपरही 25 तारखेला हीच परिस्थिती पुन्हा एकदा दिसून आल्याचे जेधे म्हणाले. प्रभाग अधिकारी पंडीत  यांना कचरा अस्त्यावस्त पडला असल्याची छायाचित्रेही सादर करण्यात आली. त्यांच्याकडून तत्काळ दखल घेण्याचे आश्वासन देण्यात आले. शनिवार आणि रविवारी हे मैदान केवळ खेळाडुंसाठी असावे अशीही मागणी यावेळी मनविसेच्या वतीने करण्यात आली. या आंदोलनात जेधे यांच्यासह शहर सचिव प्रितेश पाटील, अमित बगाटे, सचिन कस्तुर, सुहास काळे, कौस्तुभ फडके, गणोश नवले, अनिश निकम, स्वप्नील वाणी, क्षितिज माळवदकर, चिन्मय  वारंगे, नंदादीप कांबळे, योगेश चौधरी, जयेश सकपाळ, ज्ञानेश महाडिक आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :dombivaliडोंबिवली